|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंच्या पाठींबासाठी हॉकर्स एकवटले

उदयनराजेंच्या पाठींबासाठी हॉकर्स एकवटले 

प्रतिनिधी/ सातारा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर राजकीय असुयेपोटी दाखल केलेला खंडणी व मारहाणीचा गुन्हा खोटा आहे. हे एक राजकीय षडयंत्र आहे. असा आमचा ठाम विश्वास आहे. खोटय़ा गुह्याचा तपास लवकरात लवकर करावा, अन्यथा उद्रेक होवू शकतो, असा इशारा  हॉकर्स संघटना आणि खासदार उदयनराजे मित्रसमुहाने जिल्हाधिकाऱयांना निवेदनाद्वारे दिला आहे.

कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांना निवेदन दिले आहे, त्यामध्ये म्हटले आहे, खासदार उदयनराजेंनी पहिल्यापासून कोणत्याही वैयक्तिक लाभासाठी, स्वार्थासाठी आपल्या राजेपणाचा कधीच गैरफायदा घेतला नाही. उलट आतापर्यंत अनेक अडल्यानडल्या गोरगरीब जनतेला, गटतट न पहाता मदत केली आहे. खासदार उदयनराजेंनी केलेल्या अनेक धडाकेबाज कामांनी तसेच पालिकेत मिळवलेल्या सत्तास्थानामुळे त्यांचे राजकीय विरोधक सैरभैर झाले असून ऐनकेन प्रकारे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला गालबोट लावण्यासाठी त्यांच्यावर खोटय़ा केसेस दाखल करण्याचे सत्र सुरु केले आहे.उदयनराजेंना खोटय़ा गुह्यात अडकवून त्यांच्या राजकीय वर्चस्वाला केविलवाणा शह देणाऱया अशा भ्याड प्रवृत्तीचा आम्ही उदयनराजे प्रेमी तीव्र निषेध करत आहोत. नेहमीप्रमाणे याही गुह्यातून ते सहीसलामत सुटणार अशी आम्हाला खात्री आहे. उदयनराजे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व नागरिक सातारा जिल्हा बंद ठेवणार होतो. परंतु उदयनराज्sंाsंनी दिलेल्या आदेशानुसार बंद मागे घेण्याचशे तसेच नागरिकांना कोणताही त्रास होईल असे कृत्य न करण्याचे मान्य केले. तरी यामुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱया लाखो लोकांमध्ये या बद्दल उद्रेक होवून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा संभव आहे. पुन्हा असे खोटे नाटे आरोप झाल्यास जनतेच्या सयंमाचा बांध फुटल्यास त्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहिल, असे निवेदनात म्हटले आहे.

Related posts: