|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » तुरुंगातील मैत्री गुन्हेगारीवर बेततेय

तुरुंगातील मैत्री गुन्हेगारीवर बेततेय 

प्रतिनिधी/ संकेश्वर

गुन्हेगारी विश्वात प्रचंड स्वरुपाची प्रगती होत आहे. वास्तविक प्रगती रोखण्यासाठीच कायदे, तुरुंग व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र याचा उपयोग गुन्हेगारीत वाढ होण्यासाठीच अधिक होत असल्याचे आता निदर्शनास येत आहे. तथापि कायदा व्यवस्थेसमोर एक प्रखर असे आव्हान असून गुन्हेगारीचे मूळ नष्ट करण्यासाठी क्रियाशील चिंतनाची गरज वाटू लागली आहे. यासाठी तातडीने आघाडीचे प्रयत्न पोलीस यंत्रणेला करणे क्रमप्राप्त वाटते.

गुरुवारी संकेश्वर पोलीस महिलेच्या गळय़ातील चेन हिसकावल्याच्या प्रकरणी महाराष्ट्रातील दोन अट्टल चोरांना अत्यंत शिताफीने व्हन्नेहळ्ळी फाटय़ावर पकडण्यात यशस्वी झाले. पोलिसांना चोर सापडले. त्यांच्याकडील वस्तू ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयाकडे सोपवले. एवढेच केले नाही तर थोडे पुढे जाऊन त्यांचा कारनामा तपासला. मीनीनाथ गायकवाड या चोरटय़ाने महाराष्ट्रातील बऱयाच ठिकाणी चोऱया, वाटमाऱया करून पोलिसांना नेहमी चकव्वा देण्याचा प्रयत्न केला आहे. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन येरवडय़ाच्या तुरुंगात डांबले. वास्तविक मीनीनाथला एवढय़ा शिक्षेवर थांबायला हवे होते. पण त्याने तसे केले नाही उलट अर्थी विचार करून त्याच तुरुंगातून सिद्धनाथ गायकवाड याची दोस्ती केली व त्याला आपला पक्का मित्र बनवून दोघेही जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर पडले.

बाहेर पडलेल्या अगदी दोन एक दिवसात साताऱयातील हिरो होंडा युनिकॉर्न ही महागडी मोटारसायकल चोरी केली तेथून चोरांच्या जगतातील नवी पद्धत जाता जाता दागिने हिसकावणे असा बेत आखला. महाराष्ट्रात आपल्याला पाहिलेत आता कर्नाटकातून पैसा कमवायचा या हेतूने त्यांनी फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी 7 तोळे सोने हिसकावून घेऊन पोबारा केला होता. पण नव्या चेहऱयाच्या मागावर पोलीस आहेत. हे त्यांना नव मुलुख असल्याने लक्षात आले नाही. सावज टिपण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना पकडल्याने ते जाळय़ात सापडले. व त्यांच्या कारनाम्याचा एक एक पैलू उघडू लागले.

चोरी, दरोडे, खून, मारामारी अशा गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपींना शिक्षा सुनावीत असताना त्यांच्यातील गुन्हेगारीवृत्तीचा ऱहास व्हावा हा मार्मिक उद्देश अंगीकारायला हवा, अशे गुन्हेगारांना एकत्रित ठेवण्याऐवजी वेगवेगळय़ा ठिकाणी ठेवून त्यांच्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल, असे वातावरण निर्माण करायला हवे. गुन्हेगारीतून होणाऱया नुकसानीची जाणीव त्यांना समंजसपणे करून द्यायला हवी. तरच गुन्हेगारी जगतातील प्रवृत्ती नाहीशी होण्यास मदत होईल. यासाठी पोलीस प्रशासनाने खास अशा तरतुदी करायला हव्यात. अन्यथा गुन्हेगारी जगताचा ऱहास होण्याऐवजी ते यामध्ये चांगलीच प्रगती साधणार यात तिळमात्र शंका नाही.

Related posts: