|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नीरा गुळाची परदेशी सफर; मागणी वाढली

नीरा गुळाची परदेशी सफर; मागणी वाढली 

वार्ताहर/ नीरा

गुडीपाढवा सणाकरिता पुरंदर तालुक्यातील नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाची आवक वाढली असून येथील गुळाला आध्रप्रदेश, मुंबई येथून मागणी वाढली आहे. 250 ग्रॅम वजनाच्या गुळाला 4200 ते 4300 रुपये दर मिळाला आहे. गुळ  उत्पादकांमध्ये साखरेच्या दरापेक्षा गुळाच्या दरामध्ये वाढ होत नसल्यामुळे शेतकऱयांमध्ये असमाधानाचे वातावरण निर्माण आहे.

नीरा परिसरात तयार होणाऱया गुळाला राज्य व आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे. हा गुळ रंगाने पिवळसर, चवीला गोड तसेच पावशेरपासून एक किलोपर्यंत वजन, आकर्षक पॅकिंग यामुळे नीरेचा गुळ हा दर्जेदार व स्वादिष्ठ मानला जातो. नीरेच्या गुळाची महती पुण्याच्या मार्केट यार्डातील घाऊक बाजारपेठेपर्यंत आहे. तसेच पूर्वी 20 ते 30 किलोच्या ढेपा स्वरुपात गूळ तयार केला जात होता.

चिक्की गुळाला ही मागणी

त्यानंतर ग्राहकांसह व्यापाऱयांच्या मागणीमुळे आकर्षक गूळ उपलब्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय चिक्की गूळ देखील तयार होऊ लागला आहे.

परदेशातून मागणी

सध्या गुळाचा हंगाम संपल्याने आवक घटली आहे. 250 ग्रॅम वजनाचा गुळाला 4300 ते 4400,  अर्धा किलो चारशे रुपये, 1 किलो 3900 ते 4000 रुपये असा दर मिळात आहे, अशी माहिती नीरा कृषी समितीचे सभापती नंदकुमार जगताप व उपसभापती इश्वर बागमार यांनी दिली. नीरेचा गूळ आतापर्यंत दुबई, शारजा, सौदी अरेबिया, अमेरिका, इंग्लंड या देशापर्यंत निर्यात करण्यात आला आहे, असेही जगताप यांनी सांगितले.

अमोल मेमाणे, शांतीकुमार कोठडिया यांनी ही मनोगत व्यक्त केले.