|Sunday, November 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » योगामुळे जगात शांती प्रस्थापित होईल

योगामुळे जगात शांती प्रस्थापित होईल 

प्रतिनिधी/ पणजी

“संपूर्ण जगाला भारताने दिलेली योग ही सर्वात मोठी देणगी होय. आज देशामध्ये वेगवेगळे धर्म व पंथ झगडत आहेत. जगात शांती प्रस्थापित करण्याचे कार्य केवळ योग करू शकते. एक योगी हे कार्य करू शकतो. आज मोठ-मोठय़ा देशांमध्ये ‘योगा इंडस्ट्रीज’ उभ्या राहात आहेत. योग आपल्याला पैसाही देऊ शकतो, आत्मिक समाधान व शांतीही देऊ शकतो. शारीरिक व मानसिक संपूर्ण आरोग्यही देऊ शकतो. योग काय देऊ शकत नाही? आम्ही भारतीयांनी योग जगाला दिलेला आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे व आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे. आज संपूर्ण देशामध्ये योग पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुंडई येथील श्रीक्षेत्र तपोभूमी मठाचे पीठाधीश ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांनी येथील आयनॉक्स चित्रपटगृहाच्या प्रवेशद्वारासमोर उभारलेल्या प्रेक्षागृहात बोलताना केले.

 अतिमहनीय व्यक्तींच्या उपस्थितीत आज योग महोत्सव 2017 या तीन दिवसीय राज्यस्तरीय योगविषयक स्पर्धा व उपक्रमांचा समावेश असलेल्या सोहळ्याचे उद्घाटन झाले. उद्घाटन सोहळ्यासाठी व्यासपीठावर स्वामीजींसह केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर, योग महोत्सवाचे आयोजन समिती अध्यक्ष पांडुरंग केशव घाटे, कार्याध्यक्ष सौ. अनघा देशपांडे आर्लेकर, सेंट्रल काऊंन्सिल फॉर ves®ejesHe@Leer एन्ड योगा या केंद्रीय संस्थेचे संचालक ईश्वर आचार्य, आरोग्य भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश गौतम, आरोग्य भारतीचे महासचिव डॉ. सुनील जोशी आणि महोत्सवाच्या आयोजन समितीचे सचिव प्रीतेश देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पांडुरंग घाटे यांनी प्रास्ताविक केले. अनघा देशपांडे आर्लेकर यांनी सर्व मान्यवरांची ओळख करून दिली. प्रीतेश देसाई यांनी कार्याक्रमाच्या शेवटी आभार मानले.

 ब्रह्मेशांनद स्वामी आपल्या संबोधनामध्ये पुढे म्हणाले की गोवा ही पुर्वी भोगभूमी म्हणून प्रचलित होती, गोव्याचे सुपूत्र व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आज योगभूमी बनण्याच्या मार्गावर आहे, जी निश्चितच अभिमानाची व आनंदाची बाब आहे. घोव्यात जे लोक पुर्वी समुद्रकिनारे बघण्यासाठी येत होते, ते यापुढे योग शिकण्यासाठी येवोत, आणि भारतामध्ये हजारो वर्षांपुर्वी शिक्षण घेण्यासाठी विविध देशांमधुन लोक गर्दी व रांगा करीत, त्याचप्रमाणे गोव्यात व भारतात इतर देशांमधून येणारे लोक योग शिकण्यासाठी येत आहेत असे चित्र पुन्हा निर्माण होवो, अशी इच्छा स्वामीजींनी व्यक्त केली. तसेच चित्र पुन्हा एकदा उदयाला येत असल्याचे नमूद करीत त्यांनी गोव्याची प्रतिमा बदलत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ज्या गोव्यामध्ये लोक समुद्रकिनारे बघण्यासाठी येतात, त्या समुद्रकिनाऱयांवरही ‘बीच योगा सेंटर्स’ म्हणजे योग केंद्रे उभी राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नावाचा उल्लेख करीत त्यांनी पर्रीकर यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामध्ये काही निधी योगविषयक उपक्रमांसाठी व योगाच्या प्रसारासाठी राखून ठेवल्याविषयी पर्रीकरांचे अभिनंदन केले. गोवा ही भोगभूमी म्हणून नव्हे, तर योगभूमी, परशुरामभूमी म्हणून प्रसिध्द व्हावी अशी इच्छा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. 

योगामुळे भारत बलशाली व्हावा

योग हा आरोग्य चांगले राखण्याच्यादृष्टीने अतिशय योग्य असे पाऊल असल्याचे सांगताना पणजीचे आमदार सिध्दार्थ कुंकळकर यांनी योग ही आपली जीवनशैली ठरविणारी कला असल्याचे नमूद केले. योगामुळे आपण तणावमुक्त जीवन जगू शकतो. जेव्हा योगामुळे ताण-तणाव निर्माणच होणार नाही, तेव्हा ताणाचे व्यवस्थापन किंवा ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’ वगैरे करण्याची गरजच भासणार नसल्याचे कुंकळकर म्हणाले. भारत देश बलशाली, शक्तीशाली, आरोग्यवान, स्वस्थ, निरोगी व तणावमुक्त बनविण्याच्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांनी उचललेले हे यथायोग्य पाऊल असल्याचे सांगत कुंकळकर यांनी मोदी यांचे कौतुक केले.

 

योगा इन्स्टिटय़ुट, ve@®ejesHe@Leer केंद्र व दोन हॉस्पिटले उभारणार    

यावेळी बोलताना केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले की धारगळ, पेडणे येथे येणाऱया काळात Dee@ue इंडिया इन्स्टिटय़ुट ऑफ रिसर्च सेंटर फॉर ves®ejesHe@Leer उभारण्यात येणार असून त्याचबरोबर गोव्यातील कुठल्यातरी एका मतदारसंघामध्ये योग इन्स्टिटय़ुट उभारण्यात येणार आहे. तसेच दक्षिण गोव्यामध्ये 50 खाटींचे रूग्णालय आणि उत्तर गोव्यामध्ये 50 खाटींचे रूग्णालय अशी दोन हॉस्पीटले राज्यात उभारणार असल्याची घोषण नाईक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कल्पकतेमुळे आज योग जगभरात पोहोचला असल्याचे नमूद करताना त्यांनी मोदींचे कौतुक केले तसेच हा संदेश जगभरात पोहोचणे व योगाबद्दल राज्यातील प्रत्येक घरात जागृती होणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. 

आज व उद्या विविध स्पर्धा

आयनॉक्स परिसराच्या आवारात उबारलेल्या सभागृहामध्ये योग महोत्सवानिमित्त योग स्पर्धा, योगविषयक वर्ग व जागृती उपक्रम तसेच मॅकिनेज He@uesme येथे योगविषय व्याख्याने असे सगळेच ‘योगमय’ कार्यक्रम या आवारामध्ये होत असलेले आज व उद्या म्हणजेच 26 व 27 असे दोन दिवस पहायला मिळणार आहेत.

Related posts: