|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पणजीत शास्त्राrय नाटय़महोत्सवाचे उद्घाटन

पणजीत शास्त्राrय नाटय़महोत्सवाचे उद्घाटन 

वार्ताहरपणजी

आपल्या भारत देशातील संस्कृतीला फार मोठी परंपरा आहे. ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी शास्त्राrय नाटय़ातून प्रसारित होऊन ती आपल्या युवीपिढीपर्यंत पोचविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमी येथे शास्त्राrय शास्त्राrय नाटय़ महोत्सवात केले.

नाटय़प्रयोगापूर्वी मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत शास्त्राrय नाटय़ महोत्सवाचे समई प्रज्वलनाने उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर कला आणि संस्कृती खात्याचे सचिव दौलतराव हवालदार, संचालक प्रसाद लोलयेकर, राष्ट्रीय नाटय़ विद्याालय नवी दिल्ली या संस्थेचे प्राध्यापक सुरेश भारद्वाज, प्रदीप मोहंती व ए. एन. रॉय उपस्थित होते. प्रदीप नाईक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मोहंती यांनी आभार मानले.

त्यानंतर सुप्रसिद्ध मणिपुरी रंगकर्मी रतन थियाम यांनी दिग्दर्शित केलेले ‘उरूभंगम’ नाटकाचा उत्कृष्ट प्रयोग कोरस रेपर्टरी थिएटर मणिपुरी या संस्थेच्या कलाकारांनी सादर केला व रसिकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related posts: