|Monday, February 24, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » श्रीनिवासला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱया इयानचा सत्कार

श्रीनिवासला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱया इयानचा सत्कार 

अमेरिकेतील भारतीय समुदायाकडून कौतुक

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

अमेरिकेत फेब्रुवारीमध्ये श्रीनिवास कुचिभोतला याच्यावर वर्णभेदातून हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला होत असताना तो थांबविण्याचा प्रयत्न करणाऱया इयान ग्रिलोटचा भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी एक लाख डॉलर देऊन सत्कार केला आहे. कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या 32 वर्षीय तरुणाची वंशभेदातून हत्या करण्यात आली. श्रीनिवास आणि अलोक मदासानी हे दोघेजण एका बारमध्ये बसलेले होते. अमेरिकन नौदलातील माजी अधिकारी ऍडमने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी श्रीनिवास याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या इयान ग्रिलोटला देखील गंभीर जखम झाली होती.

श्रीनिवास आणि आलोकवर गोळीबार सुरू असताना ऍडमला अडवण्याची हिंमत दाखवणाऱया इयान ग्रिलोट या 24 वर्षीय तरुणाचे बरेच कौतुक झाले होते. मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या इयानच्या कृतीवर जगभरातून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत. त्याच्या या शौर्याची दखल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी देखील घेतली होती. तसेच धर्म आणि वंशाच्या आधारे होणाया भेदभावाला या देशात स्थान नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.

गोळीबारादरम्यान एका टेबलाखाली लपलेल्या इयानने ऍडमने गोळ्यांचा वर्षाव केल्यानंतर त्याला पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत ऍडमने त्याच्यावरही गोळी झाडली. ऍडमने गोळ्या झाडल्या त्यावेळी आपण त्या मोजल्या. सहा गोळ्या त्याने झाडल्याने आता त्याच्या रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्या असतील असा आपला हिशेब होता. मात्र तो चुकल्याने गोळी लागल्याचे इयानने सांगितले होते. मात्र केलेल्या कृत्याचा आपणास अभिमान आहे असे त्याने म्हटले.

Related posts: