|Monday, February 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘झी चित्र गौरव पुरस्कारा’ने वासू पाटील सन्मानित

‘झी चित्र गौरव पुरस्कारा’ने वासू पाटील सन्मानित 

प्रतिनिधी / कराड

वसंतगड येथील वासू पाटील यांना चित्रपट क्षेत्रातील ‘झी चित्र गौरव 2017’चा सर्वोकृष्ट कला दिग्दर्शक पुरस्कार सिनेअभिनेते महेश कोठारे व अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला.

वसंतगड (ता. कराड) येथील वासू पाटील यांना 2017 चा समित कक्कड दिग्दर्शित व नानुभाई निर्मित ‘हाफ तिकीट’ या चित्रपटासाठी यंदाचा ‘झी चित्र गौरव’ सर्वोकृष्ट कलादिग्दर्शक पुरस्कार जाहीर झाला आहे.

कला दिग्दर्शनासाठी अरुण कचरे निर्मित ‘काळुबाईच्या नावानं चांगभलं..’ चित्रपटापासून सुरुवात केली. त्यांनी मुरळी, सख्खा भाऊ, कुंकू झाले वैरी, शंभू, गल्लीत गोंधळ, शर्यत, टुरिंग टॉकीज, हुप्पा हुय्या, आयना का बायना, पिकुली अशा जवळजवळ 65 मराठी व दोन हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. महाराष्ट्रात ज्या गाण्याने वेड लावले त्या ‘तुझा झगा गं..’ हा त्यांचा अल्बम लक्षणीय ठरला. शर्यत, हुप्पा हुय्या, गोष्ट छोटी डोंगराएवढी या चित्रपटांसाठी पाटील यांना व्ही. शांताराम पुरस्कार कलादर्पण व सह्याद्री सिनेअवॉर्डसाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून नामांकन मिळाले आहे.

Related posts: