|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हिंदू जनजागृतीतर्फे 2 रोजी सावंतवाडीत सभा

हिंदू जनजागृतीतर्फे 2 रोजी सावंतवाडीत सभा 

सावंतवाडी

हिंदू जनजागृती समितीतर्फे येथे 2 एप्रिल रोजी होणाऱया हिंदू धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी रविवारी सकाळी सावंतवाडी शहरातून वाहन फेरी काढण्यात आली. या प्रसार रॅलीमध्ये मोठय़ा संख्येने महिला व पुरुषांनी सहभाग घेतला. हिंदू जनजागृती समितीतर्फे येथील जिमखाना मैदानावर होणाऱया सभेत श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मुतालिक, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक व हिंदू जनजागृतीचे समन्वयक मनोज खाडये हे मार्गदर्शन करणार आहेत. सभेला मोठय़ा संख्येने नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन करण्यात आले आहे.