|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » Top News » सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रिम कोर्ट

सरकारी योजनांसाठी आधार कार्डची सक्ती नको : सुप्रिम कोर्ट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सरकार सगळीकडे आधार कार्ड सक्तीचे करत असतानाच सुप्रिम कोर्टाने मात्र त्याला आक्षेप घेतला आहे. कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांना आधार कार्ड सक्ती करू शकत नाही, असे सुप्रिम कोर्टाने म्हटले आहे.

मात्र सरकारला बँक खाती उघडण्यासारख्या योजनांसाठी आधार कार्डच्या सक्तीसाठी रोखू शकत नाही, असेही सुप्रिम कोर्टाने नमुन केले. आधार कार्ड सक्तीला आव्हान देणाऱया याचिका सुप्रिम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीसाठी सात न्यायाधीशांचे गठीत करण्यात येणार आहे. समाज कल्याण योजनांसाठी आधार सक्ती नको असा सुप्रिम कोर्टाचा आदेश आहे. इन्कम टॅक्स रिटर्नसारख्या दुसऱया बाबींसाठी कोणतेही निर्बंध नाहीत.