|Monday, December 16, 2019
You are here: Home » क्रिडा » नादाल, डेल पोट्रो चौथ्या फेरीत

नादाल, डेल पोट्रो चौथ्या फेरीत 

वृत्तसंस्था/ मियामी

एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या मियामी खुल्या पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत स्पेनचा राफेल नादाल आणि अर्जेंटिनाचा डेल पोट्रो यांनी एकेरीची चौथी फेरी गाठली आहे. नादालचा वैयक्तिक टेनिस कारकीर्दीतील हा एकेरीतील एटीपी टूरवरील एक हजारावा सामना होता. या स्पर्धेतून कॅनडाच्या रेओनिकने माघार घेतली आहे.

पुरूष एकेरीच्या तिसऱया फेरीतील सामन्यात स्पेनच्या राफेल नादालने जर्मनीच्या कुहेलश्रेबरचा 0-6, 6-2, 6-3 असा पराभव केला. या सामन्यात कुहेलश्रेबरने पहिला सेट 21 मिनिटात जिंकला पण त्यानंतर 30 वर्षीय नादालने पुढील दोन सेटस् जिंकून चौथी फेरी गाठली. एटीपी टूरवर नादालने आतापर्यंत एकेरीचे एक हजार सामने खेळले असून त्यापैकी 822 सामने जिंकले आहेत. एक हजार सामने खेळणाऱया 11 टेनिसपटूंच्या यादीमध्ये अमेरिकेचा जिमी कॉनर्स 1535 सामन्यासह पहिल्या स्थानावर आहे.

तिसऱया फेरीतील अन्य एका सामन्यात जपानच्या निशीकोरीने स्पेनच्या व्हर्डेस्कोचा 7-6 (7-2), 6-7 (5-7), 6-1 असा पराभव केला. अर्जेंटिनाच्या डेल पोट्रोने हॉलंडच्या रॉबिन हॅसवर 6-2, 6-4 अशी मात केली. स्पेनच्या ऍग्युटने कझाकस्तानच्या कुकुशिखीनचा 6-3, 7-6 (7-3), स्वित्झर्लंडच्या वावरिकाने अर्जेंटिनाच्या झेबालोसचा 6-3, 6-4, जर्मनीच्या ए.व्हेरेव्हने चीन तैपेईच्या लु चा 6-0, 6-3 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. वारंवार होत असलेल्या स्नायु दुखापतीमुळे कॅनडाच्या रेओनिकने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या डोनाल्डसनला पुढे चाल मिळाली आहे.

Related posts: