|Thursday, November 14, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » रशियाच्या नव्या क्षेपणास्त्रामुळे खळबळ

रशियाच्या नव्या क्षेपणास्त्रामुळे खळबळ 

7400 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठण्याची क्षमता : रोखता येणे अशक्य

वृत्तसंस्था / मॉस्को

रशियाच्या एका नव्या क्षेपणास्त्राने अमेरिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. रशियाच्या नव्या क्षेपणास्त्रावरून फक्त अमेरिकाच नव्हे तर अनेक मोठे देश हैराण आणि चिंताग्रस्त झाले आहेत. ‘जिरकोन’ नावाच्या स्वनातीत युद्धनौकाविरोधी क्षेपणास्त्राचा वेग जवळपास 7400 किलोमीटर प्रतितास एवढा प्रचंड आहे. याचे सर्वात वैशिष्टय़ म्हणजे हे एकदा प्रक्षेपित करण्यात आल्यानंतर रोखता येत नाही. जर असे करण्याचा प्रयत्न झाला तर हे क्षेपणास्त्र मोठा विध्वंस घडवून आणू शकते.

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी या क्षेपणास्त्राची छायाचित्रे जारी केली आहेत. या क्षेपणास्त्राचे सर्वात मोठे बलस्थान याचा वेगच आहे, याचमुळे अमेरिका देखील चिंतेत आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 400 किलोमीटर असल्याचे समजते.

 आणि ते 2022 पर्यंत रशियाच्या संरक्षणदलात समाविष्ट केले जाईल.

या क्षेपणास्त्रात स्क्रॅमजेट इंजिनाचा वापर करण्यात आला असून हे हवेतील ऑक्सिजनने कार्यान्वित होते. जिरकोन सोबतच सादर करण्यात आलेली नौका किरोव शेणीच्या अणुशक्तीसंपन्न युद्धनौकांपैकी एक असू शकते. यापैकी दोन सध्या रशियन नौदलात समाविष्ट आहेत.

Related posts: