|Monday, January 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » लवचिक प्रवासभाडे व्यवस्थेत सुधाराचा विचार : रेल्वे मंत्रालय

लवचिक प्रवासभाडे व्यवस्थेत सुधाराचा विचार : रेल्वे मंत्रालय 

नवी दिल्ली

 फ्लेक्सी फेयर सिस्टीम म्हणजे लवचिक प्रवासभाडे व्यवस्थेत काही बदल करून रेल्वे विभाग राजधानीसमवेत प्रीमियर रेल्वेगाडय़ांमध्ये 50 टक्के जागा सामान्य दरात आरक्षित करण्याबाबत विचार करत आहे. सध्या फ्लेक्सी फेयर सिस्टीम ही राजधानी, शताब्दी आणि दुरंतो एक्स्प्रेसला लागू आहे. यानुसार फक्त 10 टक्के तिकिटे सामान्य दराने मिळतात, तर 10 टक्क्यांपेक्षा अधिक जागा आरक्षित झाल्यानंतर तिकिटदरात टप्प्याटप्प्याने बदल होत जातो. दीर्घ अंतराच्या राजधानी आणि दुरंतो तसेच काही शताब्दी एक्स्प्रेसमधील रिक्त राहणाऱया जागा पाहता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी काही काळापूर्वीच या व्यवस्थेचा पुनर्आढावा घेण्याचे संकेत दिले होते. फ्लेक्सी फेयर सिस्टीमद्वारे रेल्वेने आतापर्यंत 260 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले असून वर्षात हा आकडा 500 कोटीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. प्रीमियर सेवेत काही बदल करून ती प्रवाशांसाठी अधिक सोयीची बनविण्याचे प्रयत्न होत आहेत. यानुसार 50 टक्के जागा सामान्य प्रवासभाडय़ात उपलब्ध करण्याचा पर्याय आहे. याबाबत कोणताही निर्णय अजून घेण्यात आलेला नाही असे अधिकाऱयाने सांगितले. फ्लेक्सी फेयर सिस्टीम लागू झाल्यानंतर प्रवाशांच्या तिकिट आरक्षण प्रमाणावर नकारात्मक प्रभाव पडल्याचे दिसून आले आहे.

Related posts: