|Monday, September 23, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » विमानप्रवास फक्त अडीज हजारात

विमानप्रवास फक्त अडीज हजारात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी उडाण योजना लाँच झाली आहे. यामध्ये 45 नवे मार्ग जाहीर करण्यात आले आहेत. या योजनेत महाराष्ट्रातील पाच शहरांचा सामवेश करण्यात आला आहे. या मार्गावर 2500 रूपयात विमानप्रवास करता येणार आहे.

नागरी हवाई वाहतुकमंत्री अशोक गजपती राजू यांनी देशभारातील मार्गंची आज घोषणा केली. उडाण या योजनेनुसार तासभर प्रवासाच्या पहिल्या निम्या जागांसाठी ही सवलत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना 2500 रूपये मोजावे लागतील. त्याव्यतीरिक्त नियमित मूल्य मोजावे लागेल. म्हणजे जो आधी तिकीड घेईल, त्याला या संधीचा फायदा मिळेल. नांदेड-मुंबई, नांदेड-हैदराबाद, नाशिक – मुंबई, नाशिक -पुणे , कोल्हापूर-मुंबई, जळगाव-मुंबई आणि सोलापूर-मुंबई उडान योजनेच्या माध्यामांतून हे नवे विमान मार्ग जाहीर करण्यात आले आहेत.