|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » जुन्या नोटा भरण्यासाठी उद्याचा ‘आखरी दिन’

जुन्या नोटा भरण्यासाठी उद्याचा ‘आखरी दिन’ 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आपल्याकडील पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा भरण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ही मुदत उद्या संपणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर, 2016 रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर ज्या नागरिकांकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा आहेत, अशा नागरिकांसाठी त्यांच्याकडील जुन्या नोटा भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, आरबीआयच्या मुंबई, नागपूर, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या कार्यालयातच जुन्या नोटा भरता येणार आहेत. त्यासाठी नागरिकांना उद्याचा शेवटचा दिवस उरला आहे. त्यानंतर त्यांच्याकडील असणाऱया जुन्या चलनी नोटा कायमच्या हद्दपार होणार आहे.