|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » बांदा लोकोत्सव 28, 29 एप्रिलला

बांदा लोकोत्सव 28, 29 एप्रिलला 

बांदा : बांद्यात प्रतिवर्षी साजरा होणारा ‘बांदा लोकोत्सव’ यंदा 28 व 29 एप्रिलला भव्य स्वरुपात होणार आहे. या लोकोत्सवाच्या नियोजनासाठी गुरुवारी सायंकाळी अटलबिहारी वाजपेयी उद्यानात बैठक घेण्यात आली.

 दोन दिवस चालणाऱया या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. भव्य शोभायात्रेने लोकोत्सवाची सुरुवात होणार आहे. तसेच प्रतिवर्षाप्रमाणे अस्मिता ग्रुपच्या स्थानिक कलाकरांचा कार्यक्रम हे लोकोत्सवाचे खास आकर्षण आहे.

 बांदा लोकोत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, पं. स. सदस्या शीतल राऊळ, बांदा सरपंच बाळा आकेरकर, मंदार कल्याणकर, प्रियांका नाईक, अनुजा सातार्डेकर, सनी काणेकर, रुपाली शिरसाट, सिद्धेश पावसकर, रेश्मा राजगुरू, लिना गोवेकर, श्रद्धा सातार्डेकर, प्राची नार्वेकर, विशाल मळेवाडकर, साईराज साळगावकर, केदार कणबर्गी, प्रवीण नाटेकर, तुषार धामापूरकर, दिगंबर पाटकर, ऋषिकेश हरमलकर, ओंकार मालवणकर, शुभदा मयेकर, अक्षय मयेकर, सोमेश नार्वेकर आदी उपस्थित होते.

 दरवर्षीप्रमाणे रंगतदार कार्यक्रमांबरोबरच फूड फेस्टिव्हल, विविध गृहोपयोगी व अन्य वस्तुंचे स्टालही लागणार आहेत. मनोज कल्याणकर यांच्या संकल्पनेतून यंदा विशेष स्टॅच्यू सादरीकरण होणार आहे.

 या महोत्सवाची अधिकृत रुपरेषा स्पर्धांचे तपशील व विशेष पाहुण्यांची घोषणा कार्यक्रमांचे संयोजक अतुल काळसेकर हे लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे बांदा लोकोत्सव समिती अध्यक्ष सुधीर शिरसाट यांनी यावेळी सांगितले.