|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » हरिकृष्णा-गिरी लढत बरोबरीत

हरिकृष्णा-गिरी लढत बरोबरीत 

वृत्तसंस्था/ शेनझेन

चीनमध्ये सुरू असलेल्या शेनझेन लाँगगेंग मास्टर्स आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत शुक्रवारी भारतीय ग्रॅण्ड मास्टर पी. हरिकृष्णाने हॉलंडच्या टॉप सीडेड अनिश गिरीला बरोबरीत रोखले.

जागतिक बुद्धिबळपटूंच्या मानांकनात 14 स्थानावर असलेल्या हरीकृष्णाने या सामन्यात बचावात्मक खेळावर अधिक भर दिला होता. गिरीने आपला बचाव अधिक भक्कम केल्याने उभयतामधील हा डाव शुक्रवारच्या दिवसामध्ये दीर्घकालीन  ठरला. हा डाव बरोबरीत राहिल्याने दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी अर्धा गुण मिळाला. स्पर्धेच्या गुण तक्त्यात चीनचा लिरेन डिंग 5 गुणांसह पहिल्या स्थानावर असून अनिश गिरी 4.5 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. हरिकृष्णा चौथ्या स्थानावर असून त्याची पुढील फेरीतील लढत चीनच्या डिंगबरोबर होणार आहे. या स्पर्धेतील दोन फेऱया बाकी आहेत

Related posts: