|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एक तृतियांश मद्यालये वाचविणार

एक तृतियांश मद्यालये वाचविणार 

प्रतिनिधी/ पणजी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील 3,210 बारपैकी एक तृतियांश बार वाचविण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बारमालकांच्या शिष्टमंडळाला दिले. संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शनिवारी रात्री मुख्यमंत्री पर्रीकर यांची आल्तिनो येथे भेट घेतली.

यावेळी मंगलदास नाईक व ऍड. अमित पालेकर यांच्यासह अन्य बारमालकांचा समावेश या शिष्टमंडळात होता. आल्तिनो येथील सरकारी निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज्यातील मद्यव्यावसायिकांना कशाप्रकारे दिलासा देता येईल, याबाबत अभ्यास सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एक तृतियांश मद्यालये वाचविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून उर्वरित जे व्यावसायिक महामार्गापासून 500 मीटर अंतरापासून दूर जातील त्यांना परवाना मिळावा याबाबत सरकार भर देणार आहे. ज्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिका हद्दीत लोकसंख्या 20 हजारपर्यंत आहे, त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा सदर आदेश बंधनकारक असणार नाही. पण तरीही सरकार यावर अभ्यासाद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. याबाबत सरकारी अधिकारी व कायदेतज्ञांशी चर्चा सुरू असल्याचे पर्रीकर यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले.

यापूर्वी जी तावेर्न रस्त्याच्या बाजूला होती, त्यांचे रूपांतर बारमध्ये झाले. त्याचबरोबर जुने महामार्ग अधिसूचित झाल्याने त्याचाही परिणाम झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: