|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » भारतीय महिलेशी गैरवर्तन ; स्वराज यांनी मागितला अहवाल

भारतीय महिलेशी गैरवर्तन ; स्वराज यांनी मागितला अहवाल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारतीय वंशाच्या महिलेला प्रेंकफर्ड एअरपोर्टवर सुरक्षा रक्षकांनी चौकशीच्या नावावर कपडे उतरवण्यास सांगितले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी याबाबतचा अहवाल महावाणिज्य दूत रवीश कुमार यांच्याकडे मागितला आहे.

याबाबत ती महिला म्हणाली, मी आपल्या पती आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत बंगळूरुपासून आइसलँड येथे जात होते. रस्त्यामध्ये प्रेंकफर्ट एअरपोर्टवर त्यांना लाईनमधून अचानकपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी त्यांना एका खोलीत येण्यास सांगितले. तेव्हा त्यांना कपडे काढण्यास सांगण्यात आले. याप्रकरणाची माहिती मिळताच स्वराज यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Related posts: