|Saturday, January 25, 2020
You are here: Home » Top News » शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 28एप्रिलपासून आंदोलन करणार :राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 28एप्रिलपासून आंदोलन करणार :राजू शेट्टी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांबारोबरच आता मित्रपक्षांनी देखील अवाज उठवण्यास सुरूवात केली आहे. स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱयांनी कर्जमाफी न मिळाल्यास येत्या 28 एप्रिलपासून आंदोलन करण्यास इशारा दिला आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन करण्याऱया विरोधकांवरही आसूड ओढले. विरोधकांची संघर्षयात्रा ही राजकीय स्वार्थासाठी असल्याची टीका त्यांनी केली. तसेच शेतकऱयांच्या सातबारा कोरा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच कर्जमाफी न मिळाल्यास येत्या 28 एप्रिलपासून आंदोलन करू, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.

राजू शेट्टी यांनी यापूर्वीही लोकसभेत कर्जमाफीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता. ‘एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राकडे बोट दाखवितात आणि केंद्र सरकार राज्याकडे. मग नेमके कोणाचे खरे?उद्योगपतींची कर्जे माफ होतात परंतु शेतकऱयांची नाही.बळीराजाचश उत्पन्न दुप्पट करण्याचे नुसते आश्वासनच दिले गेले. त्या दिशेने मात्र कोणतीही पावले टाकली गेलेली नाहीत. तुरचे दर 12 हजारांवरून चार हजारांवर आले, सोयाबीनचे दर अडीच हजारांवर आले. अशाने उत्पन्न दुप्पट कसे होणार? असा सवाल करत शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

Related posts: