|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » सेन्सेक्स, निफ्टी पोहोचले आपल्या उच्चांकी पातळीवर

सेन्सेक्स, निफ्टी पोहोचले आपल्या उच्चांकी पातळीवर 

बीएसईचा सेन्सेक्स 290, एनएसईचा निफ्टी 65 अंशाने वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई

सप्ताह आणि नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात जोरदार तेजी आली. निफ्टी 9,200 च्या वर उघडला आणि नवीन उच्चांकावर पोहोचला. पहिल्यांदा निफ्टी 9,200 च्या वर बंद होण्यास यशस्वी ठरला. मिडकॅप निर्देशांक आणि बँक समभागातही नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. ऊर्जा आणि इन्फ्रा समभागातही जोरदार तेजी दिसून आली. आयटी समभागात मात्र विक्री आल्याने दबाव आला होता.

बीएसईचा 30 समभागांचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 290 अंशाने वधारत 29,910 वर बंद झाला. एनएसईचा 50 समभागांचा प्रमुख निर्देशांक निफ्टी 65 अंशाच्या तेजीने 9,250 वर बंद झाला.

दिग्गज समभागांबरोबर मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात खरेदी दिसून आली. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.3 टक्क्यांनी मजबूत झाला. मिडकॅप निर्देशांक 0.7 टक्यांनी वधारत बंद झाला. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.8 टक्क्यांनी वधारत बंद झाला.

सोमवारी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागात दबाव दिसून आला, मात्र खासगी बँकांमध्ये खरेदी झाल्याने बँक निफ्टी वधारत 21,550 च्या आसपास बंद झाला. आयटी समभाग वगळता औषध, वाहन, एफएमसीजी आणि रिअल्टी समभागात जोरदार तेजी आली. निफ्टीचा औषध निर्देशांक 0.9 टक्के, वाहन निर्देशांक 0.4 टक्के, एफएमसीजी निर्देशांक 0.4 टक्के आणि रिअल्टी निर्देशांक 2 टक्क्यांनी मजबूत झाले. मात्र आयटी समभागात दबाव आला होता. निफ्टीचा आयटी निर्देशांक 1 टक्क्यांपेक्षा जास्तने घसरत बंद झाला.

दिग्गज समभागांची कामगिरी

लार्सन ऍन्ड टुब्रो, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स इन्डस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, गेल इंडिया, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, एशियन पेन्ट्स 4.19-1.14 टक्क्यांनी वधारले. भारती एअरटेल, विप्रो, इन्फोसिस, एनटीपीसी, बजाज ऑटो, एडीएफसी बँक, टीसीएस 3.10-0.71 टक्क्यांनी घसरले.

जिओने प्राईम मेम्बरशिपची मुदत वाढविल्याने भारती एअरटेल आणि आयडियाच्या समभागात घसरण झाली. याचप्रमाणे इन्फोसिसचे सीओओ प्रवीण राव यांच्या वेतनवाढीबाबत एन. नारायणमूर्ती यांनी नाराजी व्यक्त केल्याने समभागात घसरण झाली.

Related posts: