|Sunday, March 29, 2020
You are here: Home » leadingnews » उत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे 1 लाखांपर्यंत कर्ज होणार माफ

उत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे 1 लाखांपर्यंत कर्ज होणार माफ 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

उत्तर प्रदेशातील शेतकऱयांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीत कॅबिनेटचे अनेक मंत्री उपस्थित होते. या बैठकीपूर्वीच शेतकऱयांना कर्जमाफी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील शेतकऱयांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

राज्यातील 2 कोटी शेतकऱयांना कर्जमाफी देण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांची तरतूद अपेक्षित होती. मात्र, राज्यातील शेतकऱयांना एक लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचा विचार सरकारकडून करण्यात आला आहे. त्यामुळे या कर्जमाफीसाठी 30 कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील शेतकऱयांना कर्जमाफी देण्याच्या मुद्यावरुन सरकारने हिरवा कंदील दिल्याने राज्य सरकार आता राज्यातील शेतकऱयांबाबत काय भूमिका घेते, याबाबत उत्सुकता कायम आहे.

Related posts: