|Thursday, November 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिवा माईन्स विरोधात आर्थिक फसवणूक गुन्हा

जिवा माईन्स विरोधात आर्थिक फसवणूक गुन्हा 

प्रतिनिधी/ पणजी

मे. लाओ जिन दादील मोबाईल कंपोनन्ट्स या चीनस्थित कंपनीला 18 कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी गोव्यातील जिवा माईन्स अँड मिनरल्स या खनिज निर्यातदार कंपनीच्या तीन पदाधिकाऱयांविरोधात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने गुन्हा नोंदविला आहे.

राघवेंद्र गोवडा, मोना गोवडा आणि जंसिता ब्रागांझा अशी जिवा माईन्स मिनरल्स कंपनीच्या पदाधिकाऱयांची नावे असून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मे. लाओ जिन या कंपनीचे प्रतिनिधी जानेवारी 2010 मध्ये गोव्यात आले होते. त्यावेळी खनिज मालाचा पुरवठा करण्यासाठी त्यांनी जिवा माईन्स कंपनीसोबत संयुक्त व्यवसाय करार केला होता.

काही दिवसांनी जिवा कंपनीने गाळेल (सिंधुदुर्ग, महाराष्ट्र) येथे खनिज उत्खनन करीत असल्याचे फोटो सदर कंपनीला पाठविले होते. ते फोटो पाहुन त्या कंपनीने जिवा कंपनीच्या नावे 18 कोटी रक्कम ट्रान्सफर केली होती. परंतु सात वर्षे पूर्ण झाली तरी कंपनीकडून खनिजचा पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे लाओ कंपनीने जिवा कंपनीविरोधात आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चीनस्थित कंपनीचे अधिकारपत्र (पावर ऑफ ऍटर्नी) गोव्यातील विफ्रेड फर्नांडिस यांच्याकडे आहे. त्यांनी वास्को प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या न्यायालयाच्या आदेशानुसार 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Related posts: