|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पोलीस स्थानकातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न

पोलीस स्थानकातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न 

प्रतिनिधी / बेळगाव

विवाह ठरला मात्र सासरच्या मंडळींनी 5 लाख रुपयांच्या हुंडय़ाची मागणी केली. शिवाय होणाऱया पतीने थेट चारित्र्यावरच संशय घेतला. यामुळे गणेशपूर येथील एका युवतीने थेट कॅम्प पोलीस स्थानकात जाऊन विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली. ठरलेला विवाह होणार नाही या नैराश्येतून त्या युवतीने हा प्रकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

श्रुती राजू गोकाक (वय 22) असे तिचे नाव आहे. तिचा विवाह ठरला होता. एप्रिल महिन्यातच तो होणारही होता. मात्र पतीकडच्या मंडळींनी विवाह व्हायचा असेल तर आधी पाच लाख रुपये द्या, अशी मागणी करून अडचणीत आणले. गरीब असल्यामुळे इतकी रक्कम देऊ शकणार नाही, अशी बाजू श्रुतीच्या पालकांनी मांडली होती. मात्र रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे तिच्या चारित्र्यावरच संशय घेण्यात आला होता.

या प्रकाराची व्यथा मांडण्यासाठी श्रुती व तिचे पालक मंगळवारी कॅम्प पोलीस स्थानकात गेले होते. यापूर्वी पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांनी मांडली होती. तरीही उपयोग न झाल्याने आलेल्या नैराश्येतून तिने हा प्रकार केला आहे. कॅम्प पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनीच आपल्या वाहनातून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

 

Related posts: