|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » संकल्प नाश हाच संन्यास

संकल्प नाश हाच संन्यास 

संन्याशाचा वनातील दिनक्रम आनंदात चालला होता. पण एकदा एक विचित्र समस्या निर्माण झाली. संन्याशापाशी अंगावर परिधान करण्यासाठी केवळ दोन लंगोट होते. एक तो अंगावर परिधान करीत असे. दुसरा धुवून झोपडीतील दांडीवर सुकत घालत असे. एकदा रात्री संन्याशाला गाढ झोप लागली असता उंदीर झोपडीत शिरला. पण त्या उंदराला खायला काहीच मिळाले नाही. शेवटी त्याने संन्याशाने दांडीवर वाळत घातलेला लंगोट पळवला. संन्यासी सकाळी उठून पाहतो, तर दांडीवर लंगोट नाही. त्याला वाईट वाटले. पण करतो काय? गावात जाऊन पुन्हा नवीन लंगोट शिवून आणला. काही दिवसात उंदराने हा लंगोटही पळवला. आता करावे काय? संन्यासी चिंतेत पडला. या उंदराचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. मग त्याला एक युक्ती सुचली. उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने एक मांजर आणले आणि ते पाळले. आता मांजर पाळले म्हणजे त्याच्यासाठी दूध हे हवेच. आता या वनात दूध कुठून मिळणार? मग त्यासाठी त्याने एक गाय पाळायचे ठरविले. पण या संन्याशाला गायीचे दूध कसे काढायचे हे कुठे ठाऊक होते? त्यासाठी त्याने एका स्त्रीला आश्रय दिला. ही स्त्री गायीचे दूध काढणे, तिचा गोठा साफ ठेवणे, तिला वनात चरायला नेणे, तिचे शेण भरणे आणि त्या शेणाने झोपडीतील जमीन सारवणे अशी सर्व कामे करी. हळूहळू ती स्वयंपाकही करू लागली. गायीबरोबर संन्याशाचीही प्रेमाने सेवा करू लागली. संन्याशाला हळूहळू ती स्त्री आवडू लागली. लवकरच त्या स्त्रीने संन्याशाच्या मनात घर केले. आता ती स्त्री समोर दिसली नाही की तो संन्यासी अस्वस्थ होऊ लागला. त्याचे ध्यानात लक्ष लागेना. डोळे बंद करून ध्यानाला बसला तरी मनात त्या स्त्रीचेच संकल्प उठू लागले. मन चुळबूळ करू लागले. अस्वस्थ झाले.

तो संन्यासी विचार करू लागला. आपली बायको कजाग होती. सारखी कटकट करायची. शेजारणीशी तर भांडणे नित्याचीच. कुणाशी म्हणून तिचे पटायचे नाही. बाजारातून हे आणा, ते आणा असा सारखा तगादा पाठी लावायची. कामावरून दमून भागून संध्याकाळी घरी आलो तर कधीही साधा चहाचा कप कधी पुढे केला नाही. जेवण तर इतके बेचव करायची की आपली भूकच मरून गेली होती. मुलांची शाळा, अभ्यास, कशाकडेही लक्ष नाही. राग आला की त्यांना बदडणे एवढेच काम. रात्रीही घोरून घोरून शांत झोप काही घ्यायला द्यायची नाही.

पण सगळय़ाच स्त्रिया काही इतक्मया वाईट नसतात. आता ही स्त्री किती प्रेमळ आहे. स्वयंपाक काय रुचकर बनवते! माझी किती कामे ही स्वतः करते. मला दुखलं, खुपलं, आजारी पडलो तर माझी किती प्रेमाने सेवा करते. लवकरच त्याने त्या स्त्री बरोबर संसार थाटला. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की मनाचे संकल्प संपल्याशिवाय कसला आला आहे संन्यास?

Related posts: