|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » ‘इमॅजिका’कडून सैनिकांसाठी ऑफर

‘इमॅजिका’कडून सैनिकांसाठी ऑफर 

प्रतिनिधी / पुणे

लष्करी दलातील जवान व त्यांच्या कुटुंबियांना एक दिवस बाहेर फिरण्याची, धम्माल करण्याची मजा अनुभवता यावी, यासाठी इमॅजिकाकडून विशेष ऑफर देण्यात आली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून जवानांना व त्यांच्या कुटुंबियांना विविध ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे. विधवा वीरपत्नींना तसेच, शौर्यपदक विजेते व युद्धात जखमी झालेल्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. आरमार दिन (15 जानेवारी) आणि नौदल दिन (15 ऑक्टोबर) या विशेष दिवशी सैन्यदलांतील सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना 50 टक्के सूट दिली जाईल. सैन्यदलातल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 20 टक्क्यांची सूट मिळणार आहे. समूह व शाळांसाठीही अन्य ऑफर्स उपलब्ध असतील.

भारतीय सैन्यदल हे जगात बलाढय़ मानले जाते. व्यावसायिकता, शौर्य आणि पराक्रमासाठी ही दले प्रसिद्ध आहेत. या सैनिकांच्या बलिदानाची जाणीव म्हणून या विरांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आणण्यासाठी इमॅजिकाचा हा खारीचा वाटा आहे, असे इमॅजिकाचे सीईओ कपील बागला यांनी सांगितले.

इमॅजिकाचे निवृत्त संचालक व सीओओ निवृत्त कर्नल आशुतोष काळे यांनी इमॅजिकाच्या वतीने कुलाबा येथील जीओसी एमऍन्डजी एरिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. आपल्या सैनिकांना इमॅजिकातर्फे अशी विशेष वागणूक मिळते आहे, याचा अत्यानंद होत आहे, असे या वरिष्ठ अधिकाऱयांनी म्हटले.