|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्री महारूद्र हनुमान संस्थानचा मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव

श्री महारूद्र हनुमान संस्थानचा मूर्ती प्रतिष्ठापना उत्सव 

प्रतिनिधी/ वास्को

नवेवाडे वास्को येथील श्री महारूद्र हनुमान संस्थानच्या मंदिराचा काल बुधवारी शिखर कलश व नवग्रह मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा पार पडला. यावेळी भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सकाळी मंगलाचरण, स्थलप्रकारशुद्धी, मधुपर्क पूजा, प्राकार बलीदान, दुपारी  शिखर कलशप्रतिष्ठा तद्नंतर दुपारी 12.05 मि. या शुभमुहूर्तावर प.पू. जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य करवीर पीठ कोल्हापूर यांच्या शुभहस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठा, तत्वन्यास पुजांगहोम, श्रींच्या पाद्यपूजा आशीर्वचन, बलिदान, क्षेत्रपाल बलिदान, महापुर्णाहुती, अवभृथस्नान, विभूतीवंदन, महानैवेद्य तद्नंतर आरती, मंत्रपुष्प, गाऱहाणे, आशीर्वाद व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.

कोल्हापुर येथील करवीर पीठाचे प.पू. जगद्गुरू श्री श्री विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्याहस्ते शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात आली. नारायण भट, गणेश भट, अनंत भट आदी पुजारी यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री हनुमान संस्थानच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष राजेश शिरोडकर, उपाध्यक्ष दत्ता सावंत, सचिव जयकांत मालणकर, उपसचिव रमाकांत शिरोडकर, खजिनदार दिनेश शिरोडकर, उपखजिनदार राजेंद्र गाड, मुखत्यार सुरेंद केरकर, सभासद प्रकाश नाईक, संजय बांदेकर, जयवंत हळर्णकर, उल्हास नाईक, बाबुश बांदोडकर, प्रशांत रायकर, संजय होन्नावरकर, इतर मान्यवर व भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, या महोत्सवानिमित्त तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमात भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून श्रींच्या कृपाआशिर्वादाचा लाभ घेतला.

Related posts: