|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानचा जत्रोत्सव उद्यापासून

चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानचा जत्रोत्सव उद्यापासून 

वार्ताहर/ पारोडा

पर्वत – पारोडा, केपे येथील श्री चंद्रेश्वर भूतनाथ संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार 7 ते पौर्णिमेपर्यंत म्हणजे मंगळवार 11 पर्यंत विविध कार्यक्रमांनिशी साजरा केला जाणार आहे. त्यानुसार 7 रोजी सकाळी लघुरूद्र, अभिषेक, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व तीर्थप्रसाद होईल.

शनिवार 8 रोजी सकाळी अभिषेक, पूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व श्रींची अंबारी रथातून मिरवणूक, तीर्थप्रसाद, रविवार 9 रोजी सकाळी अभिषेक, पूजा, दुपारी महाआरती व तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व श्रींची चांदीच्या रथातून मिरवणूक, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम होतील.

सोमवार 10 रोजी सकाळी अभिषेक, पूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री पुराण, कीर्तन, आरत्या, शिबिकोत्सव व श्रींची विजयरथातून मिरवणूक, तीर्थप्रसाद होईल. मंगळवार 11 रोजी जत्रेत्सवाच्या शेवटच्या दिवशी सकाळी अभिषेक, पूजा, दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद, रात्री दिवजांची भोवर, पुराण, कीर्तन, महाआरती, शिबिकोत्सव व पहाटे श्रींची महारथातून मिरवणूक होईल. त्यानंतर तीर्थप्रसाद, आशीर्वादाने जत्रोत्सवाची सांगता होईल.

जत्रोत्सवाच्या पाचही दिवसांत रोज दुपारी व रात्री महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. शुक्रवार, शनिवार, रविवार व सोमवारी रात्री खास कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. तरी समस्त भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित राहून श्रींच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संस्थान समितीने केले आहे. दरम्यान, जत्रोत्सवाचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष हर्षद हरी गावस देसाई, खजिनदार सूरज म्हाबळू राऊत देसाई, अखत्यार प्रकाश आनंद गावस देसाई, चिटणीस सुरेंद्र चंदू गावस देसाई व उपसमितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

Related posts: