|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कर्जमाफीच्या युपी मॉडेलचा अभ्यास करणार

कर्जमाफीच्या युपी मॉडेलचा अभ्यास करणार 

अधिवेशन संपत आले तरी राज्य सरकारने शेतकऱयांची कर्जमाफी केली नसल्यामुळे बुधवारी विरोधी पक्ष अधिकच आक्रमक झाला. उत्तर प्रदेश सरकारच्या कर्जमाफी घोषणेचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला होता. विरोधकांच्या आक्रमकतेमुळे मुख्यमंत्र्यांना त्यांना उत्तर देणे भाग पडले. यावेळी उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आदेश राज्याच्या वित्त सचिवांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उत्तर प्रदेशात कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कसा घेतला, यासाठी पैसे कुठून आणणार याचा अभ्यास करण्याचे निर्देश राज्याच्या वित्त सचिवांना सकाळी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट  केले. तसेच त्यांना यासंदर्भात एक तक्ताच करायला सांगितला आहे, असेही ते म्हणाले.

कर्जमाफी करायची की नाही हा राज्य सरकारचा निर्णय आहे. सरकार त्यासाठी सक्षम आहे. यासंदर्भात आम्हाला उच्च न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही,  आम्ही पेंद्र सरकारकडे मदत मागितली आहे, असे उत्तर विरोधकांना फडणवीस यांनी दिले.

उत्तर प्रदेश सरकारने कर्जमाफी जाहीर केली त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱयांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी विधानसभेत शिवसेना, भाजपच्या आमदारांनी केली.

बुधवारी कामकाजाला सुरुवात होताच शिवसेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांनी कराड तालुक्यातील वडगाव हवेली या गावातील जगन्नाथ चव्हाण आणि विजय चव्हाण या सख्ख्या भावांनी कर्जवसुलीला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगत सरकारने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यात कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली. कर्जमाफीसाठी कर्ज काढावे यासाठी आम्ही आमचा पाठिंबा देऊ. कर्जमाफी जाहीर करा अन्यथा आम्हाला शेतकरी दारात उभा करणार नसल्याचा राग देसाई यांनी आळवला.

सर्वपक्षीयांच्या नजरा या कर्जमाफीच्या निर्णयाकडे लागले आहे. सवर्पक्षीय समिती बनवून कर्जमाफीबाबत आढावा घेऊन उत्तर प्रदेशमध्ये ज्याप्रमाणे निर्णय घेण्यात आला तसा निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार आशिष देशमुख यांनी केली.

सुभाष साबणे यांनी कर्जमाफीची घोषणा केली नाही तर शेतकरी खरीपपेरणी बंद करण्याची घोषणा केली आहे. शेतकरी आता संप करण्याच्या पवित्र्यात आहेत त्यामुळे जर शेतकरी संपावर गेला तर खायचे काय, असा सवाल सुभाष साबणे यांनी केला.

Related posts: