|Monday, September 23, 2019
You are here: Home » Top News » 10 एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार ; शिवसेनेचा अल्टिमेटम

10 एप्रिलपर्यंत तोडगा न निघाल्यास एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार ; शिवसेनेचा अल्टिमेटम 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

खासदार रविंद गायकवाड यांनी लोकसभेत जी बाजू मांडली ती त्यांची बाजू खरी आहे. मात्र, तरीदेखील त्यांचे ऐकले जात नाही. त्यामुळे 10 एप्रिलपर्यंत यावर तोडगा निघाला नाही तर शिवसेना एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

खासदार गायकवाड यांना विमान कंपन्यांकडून तिकीट नाकारण्यात आले. या प्रकारानंतर गायकवाड यांच्यावर राजकीय स्तरातून टीका करण्यात येत होती. आज गायकवाड यांनी लोकसभेत आपली बाजू मांडली. तसेच त्यांनी सभागृहाची जाहीर माफीही मागितली. मात्र, तरीदेखील सरकारकडून यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने याप्रकरणावर तोडगा निघाला नाही तर 10 एप्रिलला होणाऱया एनडीएच्या बैठकीत बहिष्कार टाकणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.