|Saturday, February 29, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » अलवर घटनेच्या आरोपींविरोधात व्हावी कठोर कारवाई : राहुल

अलवर घटनेच्या आरोपींविरोधात व्हावी कठोर कारवाई : राहुल 

नवी दिल्ली :

राजस्थानच्या अलवरमध्ये गोरक्षकांद्वारे कथित गोतस्करांना झालेल्या मारहाणीनंतर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेला कायदा तसेच सुव्यवस्था बिघडविणारी घटना ठरवत या क्रूर तसेच विवेकशून्य हल्ल्यासाठी जबाबदार लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली.

राहुल यांनी या घटनेविषयी केलेल्या विविध ट्विट्समध्ये सरकारला लक्ष्य केले. जेव्हा सरकार आपली जबाबदारी झटकते अणि जमावाला शिक्षा करण्याची अनुमती देते तेव्हा याप्रकारच्या दुःखद घटना घडतात. या हल्ल्यासाठी जबाबदार लोकांविरोधात सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा असून योग्य विचार बाळगणाऱया भारतीयांनी या क्रूरतेची निर्भत्सना करावी असे राहुल यांनी म्हटले आहे.

4 वाहनांमध्ये अवैधरित्या गायींना हरियाणाच्या दिशेने नेणाऱया रोखून त्यात सवार 10 जणांना खाली उतरवत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेला हरियाणाचा पहलू खां याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

 

Related posts: