|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विश्वजित राणे यांचा भाजपात प्रवेश

विश्वजित राणे यांचा भाजपात प्रवेश 

प्रतिनिधी /पणजी :

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे निवडून येऊन अवघ्या सातआठ दिवसांत राजीनामा दिलेले वाळपईचे माजी आमदार विश्वजित राणे यांनी काल गुरुवारी भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, सरचिटणीस सदानंद शेट तानावडे, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, हळदोणचे आमदार ग्लेन टिकलो, हेमंत गोलतकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सत्तरीत भाजपचा विस्तार करणार

भाजपाचा आज स्थापना दिवस असून या शुभदिवशी विश्वजित राणे भाजपात प्रवेश करीत असून त्यांचे आम्ही स्वागत करीत असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. भाजप पक्षाचे धोरण, नियम मान्य असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. सत्तरी तालुक्यात भाजपाचा विस्तार करण्यासाठी ते नक्कीच काम करीतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

विश्वजित राणें यांना मंत्रीपद व कोणते खाते देणार याबाबत विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगण्याचे टाळले. वेळोवेळी आपल्याला सगळी माहिती देण्यात येईल असे ते म्हणाले.

काँग्रेसवाल्यांना कायदय़ाचा अभ्यास नाही

काँग्रेस पक्षात नेत्यांना अस्वस्थ करणारे वातावरण निर्माण झाले असल्याने राणेंची घुसमट होत होती. त्याला कंटाळूनच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला आहे. विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला असतानाही काँगेसचे काही लोक विश्वजित राणे यांना अपात्र ठरविण्याची भाषा बोलत आहेत. याचाच अर्थ त्यांना कायदा माहिती नाही किंवा, त्यांनी कायद्याचा अभ्यास केलेला नाही, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी मारला.

Related posts: