|Thursday, January 23, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उन्हातही विठठल भक्तींचा थंडावा

उन्हातही विठठल भक्तींचा थंडावा 

पंढरपूर / प्रतिनिधी

चैत्री वारी ही पंढरपूरच्या दृष्टीने प्रामुख्याने वाळवंटी वारी म्हणून संबोधली जाते. सध्यांचे वातावरण पाहता सर्वत्र उन्हांची काहीली जाणवू लागी आहे. अशा रणरण्हत्या उन्हात तेही वाळवंटात हरिहरांच्या जयघोषात विठठल भक्तींचा थंडावा हा आज अनुभवायला मिळत होता.

    पंढरपूरच्या प्रमुख चार यात्रांपैकी मराठी नववर्षातील पहीली यात्रा म्हणून चैत्री वारीकडे पाहीले जाते. वारकरी सांप्रदायात या यात्रेला अधिक व अनन्यसाधारण महत्व आहे. तसेच शिखर शिंगणापूर येथील शंभू राजांच्या यात्रेंसाठी येथूनच कावडी नेण्यांची परंपरा आहे. चैत्र महीना हा कडक उन्हांचा असतो. सध्या पंढरपूरात सुमारे 40 हून अधिक तापमान आहे. अशा परिस्थितीमधे भाविकांचा उत्साह हा तसूभर देखिल कमी दिसला नाही.

यात्रेंच्या निमित्ताने हजारों वारकरी भाविकांनी आज चंद्रभागेंमधे स्नान केले. अवकांशातून सूर्यदेवांचे सातत्याने होणारे तांडव आणि त्यातून निर्माण होणारी उष्णता अंगावर झेलत असतातना. देखिल भाविकांनी मोठया उत्साहाने अनेक काळ चंद्रभागेंच्या पात्रामधे स्नानांच्या निमित्ताने विठठल भक्तीत रममाण होउन थंडाव्यांच्या साक्षीने आनंद घेण्याचा प्रयत्न केला. तसेच दुपारनंतर मोठया प्रमाणावर भाविकांनी नौकाविहार देखिल केला.

  चेत्री यात्रा प्रामुख्याने वाळवंटामधे भरली जाते. या वाळवंटामधे राहुटया टाकून अनेक महाराजांचे किर्तन , भजंन , अभंग करण्यांची परंपरा आहे. वाळवंटातील काही जागा ठराविक महाराजांच्या फ्ढडांसाठी गेली अनेक वर्षे आरक्षित असते. मुंबई उच्च न्यायालयांने दिलेल्या निर्देशानुसार वाळवंटामधे धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली आहे. यापुढे याचवाळवंटामधे वारकर-यांची राहण्यांची, भोजनांची व्यवस्था केली जात होती. मात्र त्याला आता निर्बेध्द आले आहेत.

  या यात्रेमधे सहभागी होणारे वारकरी कोणत्या ना कोणत्या तरी दिंडी , पालखी , फ्ढडकरी मठ यांच्याशी संलग्न असतात. त्यामुळे आपसुकच वाळवंटातील किर्तन , अभंगाच्या कार्यक्रमांस उपस्थित राहतात. अशा रणरण्हत्या उन्हातही भाविक तल्लीन झालेला दिसून आला. एकादशींच्या नित्यनियमांप्रमाणे चंद्रभागा स्नान , पुंडलिक दर्शन, नगरप्रदक्षिणा आणि इतर कार्यक्रम केले जातात. एकादशींचे श्री विठठलांचे दर्शन झाल्यानंतर काही वारकरी जातो माघारी पंढरीनाथा  असा अभंग गुणगुणत जड अंतःरणाने घरी परतु लागतात.

वाळवंटाप्रमाणेच उन्हांच्या तडाख्याचे मोठे वातावरण हे दर्शनरांगेतही दिसून येत होते. विठठलांची पदस्पर्श दर्शन रांग ही आज पत्राशेडच्या आसपासपर्यत जाउन पोहोचली होती. याठिकाणी समितीच्या वतीने मंडप बांधून सावली निर्माण केली होती. तरी देखिल उन्हांची झळ ही दर्शनरांगेतील भाविकांवर येउन पडत होती. त्यामुळे साहजिकच दर्शनरांगेत ताठकळत उभे असताना उन्हांचा मोठा त्रास होत होता. तरी देखिल मनात विठठलभक्तींची असणारी ओढ ही प्रत्येक भाविकांला येथे एकप्रकारचा थंडावा निर्माण करून देणारी होती. याठिकाणी उन्हांतही भाविकांना थंड पाणी हे समितीच्या वतीने दिले जात होते.

एकंदरतरीतच वारकरी सांप्रदायाचा इतिहास आणि परंपरा पाहीली तर कष्टकरी , शेतमजूर असे भाविक मोठया कष्टांने पंढरींच्या वारीला येतात. आणि कुठल्याही अद्ययावर सुखसोंयिंचा आग्रह न धरता. मिळेल त्या सुविधांचा वापर करून केवळ आणि केवळ विठठलांच्या भकतीप्रती पंढरीस वारी पोहचवण्यास येत असतो. ऐन उन्हांळयांचा हंगाम असताना देखिल त्यामुळेच विठठल भक्तींचा थंडावा अनुभवायला मिळतो.

Related posts: