|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » एअर इंडियाने बंदी हटवूनही खा. गायकवाडांचा रेल्वेनेच प्रवास

एअर इंडियाने बंदी हटवूनही खा. गायकवाडांचा रेल्वेनेच प्रवास 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

विमान कंपन्यांनी प्रवासबंदी निर्णय मागे घेऊनही शुक्रवारी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी रेल्वेनेच प्रवास करून मुंबईत दाखल झाले आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयाचे कारण अद्यापपर्यंत समजलेले नाही. कही दिवसांपूर्वी रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करताना एका कर्मचाऱयाला मारहाण केली होती. त्यानंतल एअर इंडियासह सर्वच विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली होती, मात्र, काल अखेर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या हस्तक्षेपानंतर एअर इंडियानं ही बंदी मागे घेतली होती. त्यामुळे गायकवाड शुक्रवारी आपल्या मतदारसंघात परतताना विमानाने प्रवास करतील अशी सर्वांची अपेक्षा होती.

सूत्रांच्या मासितीनुसार गायकवाड यांच्यातील बंदी हटविण्यात आली असली तरी त्यांना दिल्ली – मुंबई राजधानी एक्सप्रेसच्या ए1 बोगीत 41क्रमांकाचे आसन अरक्षित केले होते. गायकवाड यांनी हे तिकीट आधीच आरक्षित करून ठेवले होते. तत्पूर्वी रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱयाला झालेल्या मारहाणीवर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, काल दिवसभर ऑल ाइंडिया कॅबिन क्रू संघटनेचा आक्रमक पवित्रा कायम होता. त्यामुळे माफी मागूनही एअर इंडियाने खा. गायकवाड यांचे 17 आणि 24 एप्रिल रोजीचे तीकिट रद्द करत गायकवाडांना दणका दिला होता.

Related posts: