|Friday, September 20, 2019
You are here: Home » Automobiles » ह्युंदाईची नवी Elite i20 लाँच

ह्युंदाईची नवी Elite i20 लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दक्षिण कोरियाची कार निर्माता कंपनी ह्युंदाईने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली नवी Elite i20 भारतामध्ये नुकतीच लाँच केली. या कारची दिल्ली एक्स शोरुम किंमत 5 लाख 36 रुपयांपासून 8 लाख 51 हजार रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे.

असे असतील या कारचे फिचर्स –

– आय 20 च्या नव्या मॉडेलमध्ये डय़ुअल टोन एक्सटिरिअरसह 7 इंच टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम देण्यात आला आहे.

– ऍप्पल कार प्ले आणि अँड्राइड ऑटो को स्पोर्ट करण्यास मदत करेल असे फिचर्स देण्यात आले आहे.

– सेफ्टी फिचर्ससाठी 6 एअरबॅग देण्यात आले असून, जे प्रवासाच्या दरम्यान आपल्या सुरक्षेची काळजी घेते.

– ह्युंदाई मॉडेल एलाईट आय 20 ला तीन इंजिनच्या पर्यायामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. या कारमध्ये 1.2 लिटरचे कापा डय़ुअल VTVT पेट्रोल मॉडेलमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहे.