|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

वृषभेत मंगळ व स्वराशीत सूर्य प्रवेश करीत आहे. आठवडा  परिश्रमाचा व संघर्षाचा राहील. राजकीय सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुमच्या कामाची किंमत लोकांना अधिक कळेल. संसारात अडचणी येतील. धंद्यात खर्च वाढू शकतो. नोकरीत कामाचा व्यात वाढेल. तुमची स्तुती वरि÷ करतील. घरातील व्यक्तींची चिंता वाटेल. तुम्हाला अधिक  लक्ष द्यावे लागेल.


वृषभ

तुमच्या क्षेत्रात वादाचे प्रयत्न निर्माण होऊ शकतात. वृषभेत मंगळ व मेषेत सूर्य प्रवेश करीत आहे. संसारात मिळते जुळते धोरण ठेवा. गैरसमज लवकरच  संपवा. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्या मर्जीनुसार वागावे लागेल. धंद्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल. कोर्ट केसमध्ये अहंकाराची भाषा त्रासदायक ठरेल. प्रकृतीची काळजी घ्या.


मिथुन

आठवडय़ाच्या सुरुवातीला महत्त्वाची भेट घेता येईल. वृषभेत मंगळ व मेषेत सूर्य प्रवेश करीत आहे. अधिकार वाढेल. त्यामुळे जबाबदारी घ्यावी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात संताप वाढू शकतो. तुमचे कार्य कौतुकास्पद ठरेल. स्पर्धा जिंकता येईल. संसारात खर्च व धावपळ वाढेल. वाहन जपून चालवा.


कर्क

प्रगतीची संधी तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मिळेल. संयमाने व बुद्धिचातुर्याने तुम्ही तुमचे महत्त्व वाढवू शकाल. वृषभेत मंगळ व सूर्याचे राश्यांतर तुमचा उत्साह वाढणार आहे. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. चांगल्या योजना लवकर सुरू करा. वेळेला महत्त्व द्या. दर्जेदार व्यक्तींचा सहवास मिळेल.


सिंह

मानसिक व शारीरिक ताण थोडा कमी होईल. वृषभेत मंगळ व सूर्य राश्यांतर तुम्हाला नवा उत्साह देणार आहे. राजकीय, सामाजिक कार्यात मानसन्मानाचा योग येईल. मोठय़ा लोकांच्या भेटी होतील. नावलौकीक व पुरस्कार मिळेल. संसारात सप्ताहाच्या शेवटी किरकोळ मतभेद होतील. रेंगाळत पडलेली कामे संपवण्याचा प्रयत्न करा.


कन्या

संमिश्र स्वरुपाच्या घटना घडतील. मानसन्मानाचा योग येईल तर काही ठिकाणी तुमच्याबद्दल संशय घेतला जाईल. नोकरीत काम वाढेल. राजकीय, सामाजिक  कार्यात गुप्त कारवायांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या कार्याच्या  प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत रहा. कमी बोला व काम करा. मोठी संधी पुढे आहेच.


तुळ

कार्यक्रमाची रुपरेषा आखली असती तरी त्यात अचानक बदल करावा लागेल. या आठवडय़ाच्या सुरुवातीला कटकटी, त्रास, होण्याची शक्मयता आहे. घरातील वातावरण थोडे वादग्रस्त राहील.  नोकरीत  कामाचा व्याप वाढणार आहे. बुधवार, गुरुवार व्यवहारात फायदा संभवतो. शेतकरी वर्गाने स्वत: अभ्यास करून कुठल्या पिकाची लागवड करायची याचा निर्णय घ्यावा. मुले आनंद देतील.


वृश्चिक

आठवडय़ाच्या सुरुवातीला एखादी गोड बातमी कानावर पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आपले विचार  हळूहळू लोकांना पटतील. धंद्यात गुरुवार  व शुक्रवार सावध रहा. गैरव्यवहारात अडकू शकाल. कोर्ट कचेरीच्या कामात दिरंगाई करू नका. शेतकरीवर्गाने लोकांच्या हितासाठी खूप कष्ट घेतले आहे. पण जर लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करणार असतील तर त्यांनी कठोर पाऊले उचलली पाहिजेत, आणि आताच संधी साधा.


धनु

राजकीय  उलाढालीत यशस्वी व्हाल. लोकहिताकरिता  आपण घेतलेल्या निर्णयाचे स्वागत  होईल. कर्जातून कसे बाहेर पडायचे याकरिता नवीन धोरण आखू शकाल. नोकरीत  वरि÷ आपल्या कामाचे कौतुक करतील. विद्यार्थीवर्गाला परिक्षेत चांगले यश मिळेल. आठवडय़ाच्या शेवटी प्रिय व्यक्तीबरोबर वाद, गैरसमज संभवतात. प्रकृतीची काळजी घ्या.


मकर

मंगळ, रविचे राश्यांतराने कुटुंबात तुम्ही मांडलेले विचार पटणे कठीण जाईल. तुमच्याबद्दल गैरसमज होईल. भावनेच्या भरात महत्त्वाचे गुपीत कुणापुढे उघड करू नका. नोकरीत जरी कामाचा व्याप जास्त असला तरी वेळेवर पूर्ण करू शकाल. शेतीच्या कामात मजुरांची सोय न झाल्याने आपणास काही कामांचा बोजा  पडू शकततो. विद्यार्थी वर्गाना यंदा चांगले यश मिळेल.


कुंभ

अविचाराने बोलून गेल्याने काही गैरसमज होतील ते दूर करण्याचा प्रयत्न करा व नातेसंबंध वाढवा. कलाक्रीडा क्षेत्रात आपणास नवीन संधी मिळेल. इंजिनियरिंगच्या कामात नवीन उपक्रम राबवून प्रगती करू शकाल. धंद्यात भागीदारीत मात्र सावध रहा. राजकीय क्षेत्रात तुमचे डावपेच फारसे प्रभावी ठरणार नाहीत. तुमचे मुद्दे पटवून न घेता वाकडे वागतील. कोर्टकेसमध्ये कुणावर अवलंबून राहू नका.


मीन

विचारांना दिशा मिळेल. उत्साहवर्धक वातावरण, नाटय़ चित्रपट क्षेत्रात राहिल. बुधवार,  गुरुवार दुखापत होण्याची शक्मयता आहे. राजकीय क्षेत्रात तुमच्याकडे  अधिकार येण्याची शक्मयता आहे. एखादे मोठे पद आपल्या पदरी पडू शकेल. शेतीच्या कामात पिकांच्या कापणी पेरणीकडे जातीने लक्ष द्याल. परदेशी जाण्याचा योग येईल.

Related posts: