|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » इजिप्तमधील चर्चमध्ये भीषण स्फोट ; 21 ठार, 40 जखमी

इजिप्तमधील चर्चमध्ये भीषण स्फोट ; 21 ठार, 40 जखमी 

ऑनलाईन टीम / कैरो :

इजिप्तमधील नाइल डेल्टा शहरातील टांटा येथील चर्चमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात 21 जण ठार झाले असून, 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कैरापासून 120 किलोमीटरवरील टांटामधील सेंट जॉर्ज चर्चमध्ये हा स्फोट झाला.

या भीषण स्फोटात आत्तापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून, 40 हून अधिक जखमी झाले आहेत. ख्रिश्चन बांधवांचा ‘पाम डे’ या सणाच्या दिवशीच हा स्फोट घडवून आणला गेला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही काळात ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केले जात आहे. काही आठवडय़ांनी पोप फ्रान्सिस इजिप्तच्या दौऱयावर येणार आहेत. त्यातच हा स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबतचीही माहिती अद्याप मिळालेली नाही.