|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भाजप आमदाराकडून वादग्रस्त वक्तव्य

भाजप आमदाराकडून वादग्रस्त वक्तव्य 

राम मंदिराला विरोध करणाऱयांचे शिर धडावेगळे करण्याची दिली धमकी

वृत्तसंस्था /  हैदराबाद

तेलंगणाच्या गोशामहलचे भाजप आमदार टी. राजासिंग वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एका सभेत सिंग यांनी राम मंदिराला विरोध करणाऱयांचे शिर धडावेगळे करण्याची धमकी दिली आहे.

उत्तरप्रदेशात असउद्दीन ओवैसी यांच्या पक्षाच्या एका नेत्याने राम मंदिराविरोधात टिप्पणी केली आहे. आम्ही या वक्तव्याचे स्वागत करतो, आम्ही अनेक वर्षांपासून गद्दारांनी डोके वर काढण्याची आणि आम्ही त्यांचे शिर धडावेगळे करण्याची प्रतीक्षा करत आहोत असे प्रक्षोभक वक्तव्य सिंग यांनी जाहीर सभेत केले.

राजा सिंग आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. मागील वर्षी त्यांनी हैदराबादमध्ये करण जोहर यांचा चित्रपट ‘ए दिल है मुश्किल’ दाखविणाऱया चित्रपटगृहांना पेटवू अशी धमकी दिली होती. याआधी त्यांनी गुजरातच्या उनामध्ये दलितांविरोधात गोरक्षकांच्या हिंसेला त्यांनी योग्य ठरविले होते. जून 2016 मध्ये जेव्हा हैदराबादच्या चारमिनार भागातून आयएसचे दहशतवादी पकडण्यात आले होते, तेव्हा भाजप आमदाराने ओवैसी यांच्यावर हैदराबादच्या मुस्लिमबहुल भागाला ‘मिनी-पाकिस्ताना’त रुपांतरित केल्याचा आरोप केला होता. तर 2015 मध्ये राजा सिंग यांनी उस्मानिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना बीफ फेस्टिव्हल आयोजित केल्यास दादरी घटनेची पुनरावृत्ती करू अशी धमकी दिली होती.

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर-बाबरी मशिद वादावर चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अनेक भाजप नेत्यांनी याप्रकरणी वक्तव्य केले आहे. शनिवारीच केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी मंदिरउभारणीसाठी तुरुंगात जाण्यास किंवा फासावर लटकण्यास देखील तयार असल्याचे म्हटले होते.

Related posts: