|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » मनोरंजन » परशाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

परशाच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘सैराट’ फेम आकाश ठोसरच्या नव्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा दबंग अर्थात सुपरस्टार सलमान खानने या सिनेमाचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे. एफ्यू असे या सिनेमाचे नाव आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक -निर्माते महेश मांजरेकर यांचा हा सिनेमा असून, सैराटमध्ये परशा ही मुख्य भूमिका सकारणाऱया अभिनेता आकाश ठोसरची ‘एफ्यू’मध्येही मुख्य भूमिका असणार आहे. 2 जून रोजी हा नवा सिनेमा रिलीज होणार आहे. आकाशच्या सैराटमधील भूमिकेमुळे त्याच्या पुढच्या सिनेमाची उत्सुकता होती.महेश मांजरेकरांच्य ‘एफ्यु’मधून आकाश प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.