|Thursday, September 19, 2019
You are here: Home » मनोरंजन » इरफान खानच्या ‘हिंदी मिडीयम’चा ट्रेलर रिलीज

इरफान खानच्या ‘हिंदी मिडीयम’चा ट्रेलर रिलीज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

सध्याच्या युगात इंग्रजी येणे हे खुप गरजेची बाब झाली आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी धडपड करतात. या सर्व प्रवासात मुलांची आणि त्यांच्या पालकांची बरीवा फरफट होते. याच विषयावर बेतलेला ‘हिंदी मिडीयम’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

‘आज में इंग्लिश मे बात करूंगा’ क्योंकी इंडिया इंग्लिश है और इंग्लिश ही इंडिया है’ हा डायलॉग इरफान खानचा आगामी सिनेमा ‘हिंदी मीडियम’ चा आहे. आपल्या मुलांना शाळेत प्रवे मिळावा यासाठी पालकांना काय- काय सहन कारवे लागते हे या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आपल्या मुलीला खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी तिचे पालक बरीच मेहनत घेतात. त्यावेळी नेमके काय घडते हे टिपण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यात आला आहे. आज देशात सगळीकडेच जवळजवळ अशीच परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळावा यासाठी पालकांनी अक्षरशः शाळांचे उबंरठे झिजवावे लागतात. याच सगळय़ा घटनेवर हा चित्रपटा आधरित असणार आहे.