|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » भारत इस्रायलकडून 8000 क्षेपणास्त्रे घेणार

भारत इस्रायलकडून 8000 क्षेपणास्त्रे घेणार 

वृत्तसंस्था /  नवी दिल्ली

 इस्रायल या मध्य-पूर्वेतील बलाढय़ देशाशी घनिष्ट संरक्षण संबंध प्रस्थापित करण्यासाठी भारत त्या देशाशी दोन महत्वाचे संरक्षण करार करणार आहे. त्यापैकी एक करार इस्रायलकडून 8000 अत्याधुनिक क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा आहे. शिवाय अनेक प्रकारच्या संरक्षणसामग्रीचे तंत्रज्ञान मिळविण्याचाही भारताचा प्रयत्न आहे. लवकरच या करारांवर स्वाक्षऱया होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या जुलैत इस्रायलच्या दौऱयावर जाणार आहेत. या दौऱयाचे निमित्त साधून हे करार करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. इस्रायलने विकसीत केलेल्या संरक्षण तंत्रज्ञानाची ख्याती जगभरात आहे. भारतालाही आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता असून त्यामुळे या देशाशी जवळीकीचे संरक्षण संबंध प्रस्थापित करण्याच्या दिशेने भारताची पावले झपाटय़ाने पडत आहेत. इस्रायलचाही या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

स्पाईक आणि बराक

स्पाईक हे इस्रायलने विकसीत केलेले रणगाडाविरोधी क्षेपणास्र असून बराक 8 हे विमान विरोधी क्षेपणास्त्र आहे. भारत या दोन्ही प्रकारची मिळून 8 हजार क्षेपणास्त्रे व त्या संबंधीचे तंत्रज्ञान विकत घेणार आहे. यासाठी 1.5 अब्ज डॉलर्स (सुमारे 11 हजार कोटी रूपये) खर्च येणार आहे. अमेरिका आणि इस्रायल यांच्यात घनिष्ट मैत्री असल्याने इस्रायलशी असलेल्या जवळीकीचा उपयोग अमेरिकेशी संबंध अधिक सुदृढ करण्यासाठीही होईल, असे मोदींचे धोरण आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

स्पाईक क्षेपणास्त्र घेण्याचा प्रस्ताव संरक्षण खरेदी मंडळाने ऑक्टोबर 2014 मध्ये संमत केला होता. तर बराक 8 विकत घेण्यास 3 एप्रिल 2017 ला संमती मिळाली आहे. या शिवाय इस्रायलकडून अत्याधुनिक लढाऊ ड्रोन विमाने विकत घेतली जाणार आहेत. त्यामुळे एकाचवेळी पाकिस्तान आणि चीनच्या वायुदलांचा सामना करणे भारताला शक्य होणार आहे.

इस्रायल हे भारताला संरक्षण सामग्री पुरविणारे तिसऱया क्रमांकाचे सर्वात मोठे राष्ट्र आहे. गेल्या तीन वर्षात या देशाशी भारताचे 10 संरक्षण सामग्री करार झाले असून त्यांचे मूल्य 7 हजार 600 कोटी रूपये इतके आहे.

संयुक्त संशोधन व विकास

भारताने मध्यम आणि दीर्घ पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱया क्षेपणास्त्रांचे संशोधन इस्रायलच्या राफायल या संरक्षण संशोधन संस्थेच्या तांत्रिक साहाय्याने केले आहे. या प्रकल्पात भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत डायनॅमिक्स आणि लार्सन अँड टुब्रो या संस्थांचाही समावेश आहे. हा 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 22 हजार कोटी रूपये) मूल्याचा प्रकल्प आहे. या प           खकल्पाअंतर्गत केवळ क्षेपणास्त्रेच नव्हे, तर सहाव्या पिढीतील लढाऊ विमान, जहाज विरोधी क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे, शस्त्रसज्ज ड्रोन्स इत्यादी साधनांचा विकासही केला जाणार आहे.

 नवी दिल्ली

Related posts: