|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » इंफोसिसकडून चौथ्या सत्राचे निकाल जाहीर

इंफोसिसकडून चौथ्या सत्राचे निकाल जाहीर 

 बेंगळूरू / वृत्तसंस्था :

  द्वीतीय क्रमांकाची स्वदेशी माहिती-तंत्रज्ञान दिग्गज इंफोसिसकडून गुरूवारी चौथ्या आणि अंतिम तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. 2016-17 आर्थिक वर्षातील जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला 3,603 कोटी नक्त नफा झाल्याचे इंफोसिसने जाहीर केले आहे. कंपनीच्या भागधारकासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे वर्तमान 2017-2018 या वित्त वर्षात डिव्हीडेंड किंवा समभागांच्या पूनर्खरेदीच्या माध्यमातून इंफोसिस भागदारकांना 13000 कोटी रूपये अदा करणार आहे.

  बॉम्बे भांडवली बाजारहला कंपनीकडून पुरविण्यात आलेल्या माहितीनूसार गतवर्षीच्या समानकालावधीत कंपनीचा नक्त नफा 3,597 कोटी रुपये एवढा होता. त्यात यावर्षी 0.2 टक्के एवढी अल्पःशी वाढ झालेली आहे. तर गतवर्षीच्या समानकालावधीत असणाऱया 16,550 कोटी रुपये महसूलात यावर्षी 3.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2016-17 सालच्या शेवटच्या तिमाहीतील इंफोसिसचा महसूल 17,120 कोटी रुपये एवढा असल्याची माहिती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला देण्यात आली आहे. गतवर्षीच्या तूलनेत कंपनीच्या नफ्यात तसेच एकूण प्रदर्शनात असमाधानकारक वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना, अनपेक्षीतरीत्या उद्भवलेली आव्हाने आणि चौथ्या सत्रातील हंगामी संवेदनशिलतेच्याकारणाने आलेल्या विचलतेमुळे एकंदरीत कामगिरीला फटका बसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का म्हणाले. परंतु 2017-18 वित्तवर्षातील आपल्या कामगिरीबाबत कंपनी सकारात्माक असून सध्याच्या उत्पन्नात तब्बल 6.1 ते 8.1 टक्क्यापर्यंत वाढ होणार असल्याचा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. बॉम्बे भांडवली बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत निर्देशक रवी वेंकटेंश यांची उप-संचालक म्हणून निवड करण्यात आल्याची माहितीही इंफोसिसकडून देण्यात आली आहे.