|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » कर्नाटक बँक सीईओपदी महाबलेश्वर एम. एस.

कर्नाटक बँक सीईओपदी महाबलेश्वर एम. एस. 

बेंगळूर / वृत्तसंस्था :

कर्नाटक बँक लिमिटेडच्या व्यवस्थापनात फेरबदल करण्यात आले. बँकेच्या सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पी. जयराम भट यांना अर्धवेळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचप्रमाणे प्रमुख व्यवस्थापकीय संचालक महाबलेश्वर एम. एस. यांना व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बनविण्यात आले. ते 15 एप्रिलपासून आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारतील. बँकेच्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवनियुक्त सीईओ महाबलेश्वर हे पद स्विकृतीनंतर आयबीआयच्या नियमांनुसार पुढील तीन वर्षांपर्यंत या पदावर राहतील.

जयराम भट यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून त्याला आरबीआयकडून परवानगी देण्यात आली. अनंतकृष्णन हे 26 ऑक्टोबर रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. जयराम भट यांनी आपल्या पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भट यांची 14 जुलै 2009 मध्ये व्यवस्थापक संचालक आणि सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली होती. मात्र दोन दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. 13 जुलै 2018 पर्यंत त्यांना वाढीव मुदत देण्यात आली आहे.