|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » पाणी प्रश्नासाठी पुढाऱयांना आस्था नाही

पाणी प्रश्नासाठी पुढाऱयांना आस्था नाही 

सोलापूर / वार्ताहार :

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकार आणि पुढाऱयांच्यावर विसंबून राहू नका, पाण्याच्या प्रश्नाबाबत पुढाऱयांना अस्था नाही. त्यामुळे आपल्या गावाचा पाणी प्रश्न आपणच श्रमदानातून सोडवून गावाला पाणीदार बनवू शकता. असे झाल्यास निश्चितपणे दुष्काळावर आपण मात करू शकू शिवाय सोलापूर जिल्हा पाणीदार होण्यासही वेळही लागणार नाही असे मत प्रसिध्द अभिनेते अमिर खान यांनी व्यक्त केले.

दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फौडेंशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हय़ाच्या दुष्काळी पटय़ातील अनेक गावात श्रमदानातून कामे सुरू आहेत. या कामांची पहाणी करण्यासाठी आणि या मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी पाणी फौंडेशनचे प्रमुख आणि सिने अभिनेते अमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरणराव या गेली दोन दिवस सोलापूर जिल्हय़ाच्या दौऱयावर आले होते. त्यांनी आपल्या या दोन दिवसाच्या दौऱयात बुधवारी सायंकाळी उत्तर सोलापूर तालुक्यातील राळेरास आणि गुरूवारी सकाळी नान्नज व भागाईवाडी येथील कामाची पहाणी करीत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.

बुधवारी सायंकाळी सोलापूर जिल्हय़ाच्या दौऱयावर आलेल्या अमिर खान आणि किरण राव या पती पत्नीने रात्रीच राळेरास गावाला भेट देऊन तेथील कामाची पहाणी केली. कोणताही डामडौल न करता संपूर्ण गावाने अमिर खान आणि किरण राव यांचे उस्फूर्तपणे स्वागत केले. गावात सुरू असलेल्या विविध कामांची पहाणी करीत अमिर खान आणि किरण राव यांनी रात्रीच्या वेळेही ग्रामस्थांच्याबरोबर  श्रमदान करून ग्रामस्थांना प्रोत्साहीत केले.

Related posts: