|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यपालांकडे जाण्यास दिग्विजय सिंहनी अडविले

राज्यपालांकडे जाण्यास दिग्विजय सिंहनी अडविले 

प्रतिनिधी /पणजी :

ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले त्या रात्री म्हणजेच 11 मार्च रोजी आमच्याकडे 21 आमदारांचे बहुमत होते. आपण राज्यपालांना सादर करण्यासाठी पत्रही टाईप करून घेतले आणि राज्यपालांकडे जाणार होतो. तथापि, काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी राज्यपालांकडे तातडीने जाण्याची गरज नाही, नियमानुसार त्यांना आम्हालाच बोलवावे लागेल असे सांगून आपल्याला राज्यपालांकडे जाऊ दिले नाही, असे सांगून या संपूर्ण राजकीय नाटय़ास आपण मुळीच जबाबदार नसल्याचे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी स्पष्ट केले आहे.

फालेरो हे नवी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून गोव्यात परतले आहेत. त्यांच्याविरोधात स्वाक्षऱयांची मोहीम सुरु करण्यात येत असल्याचे वृत्त काल गुरुवारी प्रसिद्ध झाल्यानंतर फालेरो यांनी सांगितले की, आपल्याला कोणत्याही पदांमध्ये रस नाही. आपण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा कधीच सादर केला होता. आपण पक्षासाठी व गोव्यासाठी फार मोठा त्याग केलेला आहे. आपण राष्ट्रीय पातळीवर दिल्लीहून पक्षाचे काम पाहत होतो. आपल्याजवळ 6 राज्यांचा कार्यभार होता, मात्र आपल्याला गोव्यात जाऊन पक्षाचा कारभार पूर्वपदावर आणा, असा आदेश सोनिया गांधी यांनी दिला व आपण हे काम हाती घेतले.

कधीही पदाची अपेक्षा धरली नाही

काही निरर्थक ओरड करणारी कुत्री विनाकारण भुंकत असतात. ज्यांनी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार देखील येणार नाही एवढेच नव्हे तर आपण स्वत: कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार हेसुद्धा ठरविलेले नाही अशी घोषणा करणाऱयांनी पक्षावर बोलण्याची नैतिकता गमावलेली आहे. आपण पक्षासाठी मोठा त्याग केलेला आहे. गोव्यात जो आलो तो कोणत्याही स्वार्थी हेतूने आलो नाही. तर केवळ पक्षाला मजबूत करण्यासाठी. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळून देखील पक्ष सत्तेवर आला नाही, त्यास आपण जबाबदार नाही असे लुईझिन फालेरो म्हणाले.

Related posts: