|Monday, September 23, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » आंबेडकर यांच्या आदर्शांचा सर्व देशांनी अवलंब करावा!

आंबेडकर यांच्या आदर्शांचा सर्व देशांनी अवलंब करावा! 

संयुक्त राष्ट्र :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांच्या मार्गावर सर्व देशांनी चालावे असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱया केले आहे. सर्व देशांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करत सामाजिक न्याय आणि समानतेसाठी संघर्ष करावा असेही त्यांनी म्हटले. माहिती आणि तंत्रज्ञानाद्वारे बदलणाऱया युगात आम्ही राहत आहोत. सर्व देशांनी सामाजिक आणि वित्तीय समावेशासोबत समाजाच्या प्रगतीत डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करावा असे संयुक्त राष्ट्र महासचिव अमीना मोहम्मद यांनी वक्तव्य केले. महिला, अल्पसंख्याक आणि वंचितांच्या अधिकारांसोबत ठामपणे उभे राहिलेले आंबेडकर आज असते, तर त्यांनी देखील या प्रयत्नांचे स्वागत केले असते असेही त्यांनी म्हटले.  आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त भारताच्या स्थायी दूतावासाकडून आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.