|Tuesday, November 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बारबंदीप्रकरणी काँग्रेसकडूनच दिशाभूल

बारबंदीप्रकरणी काँग्रेसकडूनच दिशाभूल 

प्रतिनिधी/ पणजी

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या बार बंदी निर्देश विषयावरून काँग्रेस पक्ष राजकारण करीत असून तोच पक्ष जनतेची दिशाभूल चालवत असल्याचा पलटवार भाजपने केला आहे.

पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते दत्तप्रसाद नाईक म्हणाले की सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचा फटका कमीत कमी लोकांना बसेल यासाठी सरकार कार्यरत असून संपूर्ण अभ्यास करूनच फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे. कॉग्रेसचे सरकार असणारी अनेक राज्ये फेरविचार याचिका घेवून सुप्रीम कोर्टात गेली खरी परंतु त्याचा काहीच लाभ किंवा दिलासा मिळाला नाही असा दावा करून श्री. नाईक यांनी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, पंजाब, पाँडेचरी, मिझोराम या काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यातील निम्मे बार मद्यालये बंद करण्याची पाळी आल्याचे निदर्शनास आणे व त्यांची आकडेवारी सादर केली.

गोव्यातील अनेक बार-मद्यालये वाचवण्यात यश आल्याचा दावा करून श्री. नाईक म्हणाले की पर्रीकर सरकारवर मद्य व्यापारी बारवाले यांचा पूर्ण विश्वास असून 75 ते 80 टक्के मद्य उद्योग वाचवण्यात यश येईल अशी खात्री आहे. याउलट काँग्रेसच्या राज्यात काहीच झालेले नाही. तेथे त्यांना कोणालाच वाचवण्यात यश आलेले नाही. काँग्रेसचे गोव्यातील नेते या प्रकरणी उगाच विनाकारण राजकारण करून भाजप सरकारवर आगपाखड करीत आहेत. त्यांना सरकार स्थापन करता आले नाही म्हणून ते वैफल्याग्रस्त होवून वाटेल ते बोलत आहे. काँग्रेसच्या नेत्यांना जर खरेच कळवळा असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात फेरयाचिका दाखल करावी असे आव्हानही नाईक यांनी दिले आहे.

 

Related posts: