|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आमचे आई-बाबा कधी येणार?

आमचे आई-बाबा कधी येणार? 

उदय सावंत/ वाळपई

खाण क्षेत्रातील समस्यांचा सामना करताना जन्माला आलेल्या आंदोलनाच्या पाठबळावर आई-वडील कोलवाळ न्यायालयीन कोठडीत जावून बरेच दिवस झाले. अनेक घरांना कुलूप, लहान मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, भागातील काही वयस्कर महिलांची व तरुणांची ग्रामस्थांना कोठडीतून बाहेर काढण्यासाठी धावपळ व परस्परांना मदतीचा हात देण्याची नागरिकांची कृती अशी विचित्र परिस्थिती आज सोनुस गावावर उद्भवलेली आहे. लहान मुले आपल्या आई-वडीलांची आठवण काढताना ते कधी येणार? अशा हृदय पिळवटून टाकणाऱया प्रश्नाला आज सोनुस गाव सामोरे जात आहे. सरकारने गावावर नांगर फ्ढिरविण्याचा जणू विडाच उचलला आहे. सरकारी यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर करून निदान कुटुंबाचा तरी विचार करून कारवाई करण्याची काळाची गरज होती. या भागातील राजकारण्यांच्या आशीर्वादाने हा सर्व प्रकार चालला आहे. याचा समारोप कधी होणार हे सांगता येत नाही. मात्र सोनुस नागरिकांसमोर निर्माण झालेल्या त्रासाचे फ्ढळ त्यांना देवच देणार आहे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया भागातील वयस्कर महिलांनी व्यक्त केल्या आहेत.

सोनुस येथील घरातील महिला, पुरुष यांना कायद्याने कोलवाळ येथील न्यायालयीन कोठडीत बंदीस्त केले आहे. यामुळे आई-बाबांविना मुलांचा संभाळ गावाच्या आजी सोमारगे गावडे व शांताबाई गावडे करीत आहेत. त्या दोघीही डोळ्य़ात अश्रृ आणीत गेल्या काही दिवसांपासून जवळपास 12 मुलांचा सांभाळ करीत आहेत. मुलांची पालन पोषणाची जबाबदारी आज त्यांच्यावर आली आहे. त्यांच्या पोटापाण्याबरोबर देखभाल करावी लागत आहे. सरकारने विचित्र अवस्थेत ही पाळी त्यांच्यावर आणली आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही प्रदुषण विरोधात तीव्र स्वरुपाचा लढा देत आहोत. मात्र खाण कंपन्या खास करून सेसा गोवा खाण कंपनी आर्थिक बळाचा वापर करून सोनुसवासियांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारची यंत्रणा हाताशी धरून हा प्रकार व्यवस्थितपणे सुरु आहे. दुर्दैवाची बाब अशी की मतांची भीक मागण्यासाठी येणाऱया राजकीय नेत्यांचाही खाण कंपन्यांना पडद्यामागून पाठिंबा आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

गेली अनेक वर्षे प्रदुषणाच्या समस्या, रोजगारांची कंपन्यांकडे मागणी करणे हा कायद्याने गुन्हा आहे का? असा सवाल यावेळी महिलांनी केला. सोनुस गाव आज आंदोलनाच्या धगधगीत जळत आहे. मात्र विविध खाण कंपन्या याचा आसुरी आनंद घेण्याचा प्रयत्न करीत असताना खनीज मालाची वाहतूक विदारक अवस्थेत करीत आहे. गावाच्या इतिहासात प्रथमच जवळपास पूर्ण गाव कोठडीत आहे. त्यांना कोठडीत पोहोचविणाऱयांना ईश्वर नक्कीच शिक्षा देणार, कारण मुलांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून काही मुले आई-वडीलांच्या आठवणीने जेवण करीत नाही व रात्री झोपत नाही. त्यांची निगा राखण्यासाठी मोठी समस्या निर्माण होत आहे, असे यावेळी शांताबाई गावडे यांनी सांगितले.

आई-वडीलांच्या आठवणीने काही मुलांची प्रकृती रडून बिघडली असल्याने त्यांना सांखळी सामाजिक रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांना कोणत्याही स्वरुपाची कमतरता भासणार नाही यासाठी काही तरुण धावपळ करताना दिसत आहे. न्याय मिळेपर्यंत कोणत्याही राजकारण्यांचे पाय धरणार नाही अशा स्वरुपाचा पवित्राही त्यांनी घेतला आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना एका तरुणाने सांगितले की, 11 रोजी सोनुस नागरिकांवर अटकेची कारवाई करण्यात येत होती. तेव्हा एका राजकारण्याला शेकडोवेळा फ्ढाsन केले मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांना मॅसेज पाठवूनसुद्धा कोणत्याही स्वरुपाचा प्रतिसाद न देणारा राजकारणी हा विश्वासघातकी आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.

यावेळी गावाचा फ्sढरफ्ढटका मारला असता अनेक घरांना कुलूपे असल्याची माहिती मिळाली. घरात कोणीही नसल्याने लहान मुले दोन आजीकडे राहात आहे अशी परिस्थिती पाहायला मिळते. अनेक घरांना कुलूपे पडल्याने गावात विदारक स्वरुपाची शांतता पसरली आहे. हताशपणे तोंडाला पाहणाऱया मुलांचा प्रश्न एकच! आमचे आई-बाबा कधी येणार

Related posts: