|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा »

 

प्रतिनिधी/ वाळपई

प्रदुषणाच्या मुद्यावर व विविध खाण कंपन्यांकडून रोजगार व इतर स्वरुपाच्या संधी मिळण्यासंबंधी कोणत्याही स्वरुपाची माघार घेणार नाही. खाण कंपन्यांनी सरकारच्या योजनांचा गैरवापर करून आमच्यावर अत्याचार, अन्याय करायचा असेल तो आम्ही भोगण्यास तयार आहोत. यासाठी जीवाची पर्वा करणार नाही आणि येणाऱया संकटांना तोंड देण्याची तयारी असल्याची आक्रमक भूमिका सोनुस गावच्या नागरिकांच्या प्रतिनिधीने डिचोली उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत मांडले आहे. सोनुस गावातील नागरिकांनी सेसा गोवा खाण कंपनी व इतर विविध कंपन्यांची वाढती दादागिरी, प्रतिदिन वाढणारे प्रदुषण यांच्या पार्श्वभूमीवर सुरु केलेल्या आंदोलनातून सरकारने या नागरिकांना रास्ता रोको केल्याचा ठपका ठेवून अटक करून यांना कोलवाळ येथील न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. याचे पडसाद आज प्रामुख्याने या बैठकीत उमटले. नागरिकांनी आक्रमकपणे मांडलेल्या मुद्यांसमोर खाण कंपनीच्या अधिकाऱयांची बोलती बंद झाली. उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत आपला महत्त्वपूर्ण निर्णय सेसा गोवा खाण कंपनीने सुरू केलेले अतिरिक्त खनिज मालवाहतुकीचे ट्रक शनिवारी (उद्या) पासून त्त्वरीत बंद करण्याचा आदेश दिला आहे. याची अंमलबजावणी शनिवारपासून न झाल्यास कंपनीविरोधात कारवाई करण्याचा इशाराही उपजिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.

या संबंधीची माहिती अशी की, अनेक खाण कंपन्यांची सोनुस गावातील प्रमुख मार्गावरून होणारी खनिज मालाची वाहतूक यामुळे धुळ प्रदुषण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. याचा त्रास नागरिकांना मोठय़ाप्रमाणात होताना दिसतो. या बाबत खाण कंपनी अधिकाऱयांना वारंवार तक्रारी करूनदेखील काहीच परिणाम न झाल्याने नारिकांनी प्रदुषण विरोधात रास्ता रोको आंदोलन हाती घेतले आहे. सरकार बरोबरच खाण कंपन्यांचे लक्ष वेधण्यासाठी 8 रोजी रास्ता रोको करण्यात आल्यानंतर 9 रोजी उपजिल्हाधिकाऱयांनी महत्त्वाची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी 11 रोजी पुन्हा रास्ता रोको करून खाण कंपन्यांची वाहतूक रोखून धरल्याप्रकरणी 42 जणांना अटक करून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आल्याने हे प्रकरण मोठय़ाप्रमाणात चिघळले आहे. अटक करण्यात आलेले नागरिक अजुनही कोठडीत असल्याचे प्रतिबिंब बैठकीत पहायला मिळाले. सध्या सहाही कंपन्यांची वाहतूक दरम्यान प्रतिदिन 1200 ट्रक काम करीत असताना सेसा गोवा खाण कंपनी आणखीन 200 ट्रक सुरू करण्यात पाहत आहे. पैकी काही ट्रक सुरू झालेले आहेत. यास ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला व सदर ट्रक त्वरीत बंद करण्याची मागणी लावून धरली. याची तत्काळ दखल घेत शनिवारपासून अतिरिक्त ट्रक बंद करण्याचा आदेश उपजिल्हाधिकाऱयांना कंपनीच्या प्रतिनिधींना दिली. यास कंपन्यांनी मान्यता दिली आहे. याव्यतिरिक्त धूळ प्रदुषणावर उपाय योजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांना काही कंपन्या खोटा अहवाल तयार करून प्रदुषण होत नसल्याचे सांगत आहेत. मात्र घटनास्थळी परिस्थिती वेगळी आहे, असा मुद्दा यावेळई मांडण्यात आला.

यावेळी अटक करण्यात आलेल्या आंदोलन करत्यांच्या सुटकेसाठी जामीन अर्ज सादर करण्याची विनंती अधिकाऱयांनी केली मात्र 42 जणांच्या सुटकेसाठी एवढा निधी कुठून येणार असा सवाल नागरिकांनी केला. नागरिकांनी आपल्या मागण्या उपजिल्हाधिकाऱयांना सादर केल्या आहेत. या संबंधी येणाऱया काळात विशेष बैठक घेण्यात येणार आहे.

दरम्यान, मिळालेल्या अधिक माहितीनुसार सोनुस ग्रामस्थांचा धग पणजीपर्यंत पोहोचला आहे. सरकारने यावर गांभीर्याने विचार केला आहे. या संबंधीची महत्त्वाची बैठक सोमवारी दि. 17 रोजी सकाळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबत होणार आहे, असे समजते.

Related posts: