|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सुवर्ण महोत्सवीवर्षात विविध कार्यक्रम आयोजित करणार

सुवर्ण महोत्सवीवर्षात विविध कार्यक्रम आयोजित करणार 

संस्थेच्या बैठकीत निर्णय पहिला कार्यक्रम 30 एप्रिल रोजी मौजीबंधन

प्रतिनिधी/ पणजी

त्वष्टा ब्राम्हण समाजोत्कर्ष संस्था या वर्षी म्हणजे 2017-18 सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. 2017-18 या काळात संपूर्ण वर्षभर संस्थेतर्फे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सुवर्ण महोत्सवी वर्षे साजरे करण्यात येणार असल्याचे नुकत्याच झालेल्या सभेत ठरविणीत आले आहे.

म्हपसा येथील म्हापसा अर्बन बँकेच्या नंदादिप सभागृहात ही बैठक झाली. यावेळी बैठकीत अध्यस्थान संस्थेचे अध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी भुषविले होते. त्यांच्यासोबत व्यसपिठावर माजी अध्यक्ष ऍड. निशिकांत शिंदे, सचिव शिवनाथ सावंत, खजिनदार नारायण शिंदे, व उपाध्यक्षक गजानन सावंत उपस्थित होते.

 सामुहिक मौजीबंधन हा सुवर्ण महोत्वातील पहिला कार्यक्रमा होणार आहे. 30 एप्रिल रोजी कुंकळी बाळ्ळी येथील महालक्ष्मी सभागृहात हा कार्यमक्र आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण गोव्यात असलेल्या न्याती बांधवांसाठी हा कार्यक्रम सोयीचा ठरणार आहे. या कार्यक्रमात दक्षिण गोव्यातील न्याती बांधवानी आपल्या मुलाचे मौजीबंधन करून घ्यावे असे आवाहन बैठकीत करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील न्यातीबांधवासांठी मौजीबंधनाच्या कार्यमक्राचा दुसरा ठप्पा उत्तर गोव्यात होणार आहे. ऑगष्ठ महिन्यात युवा मेळावा आयोजित करावा या ठरावालाही बैठकीत अनुमोदन देण्यात आले आहे. समाजातील बांधवाना एत्र आणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे ओयोजन करण्याचे बैठकीत ठवण्यात आले आहे.

 यावेळी अध्यक्ष नरेश तिवरेकर यांनी प्रस्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. सचिव शिवनाथ सावंत यांनी संस्था 50 व्या वर्षात पदार्पण करीत असल्याची सविस्तर माहिती दिली. 50 वर्षातील संस्थेचे कार्य आणि पुढील वाटचाल या विषयीही त्यांनी विचार मांडले. समाजातील नातेबांधवांचे सर्वेक्षण करणे सुरु आहे. त्यासाठी खास समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीतर्फे काम सुरु असून तयांनी माहिती गोळा करणे सुरु केले आहे. गोव्याच्या कानाकोपऱया न्यातीबांधव विखूरलेले आहेत त्यांची माहिती गोळा करून त्यांना संस्थेशी जोडणे फार महत्वाचे आहे. त्यासाठी विहित अर्ज भरून घेण्याचे काम सुरु असल्याचे शिवानाथ सावंत म्हणाले.

मौजीबंधना दिवशी मुंबई येथील गोडांबे हे पौरहित्य करणार आहेत. तसेच ज्ञातीबांधवांच्या मुलांना मौजीबंधना विषयी सविस्तर माहिती देतील असे माजी उपाध्यक्ष सतीश बुक्कम यांनी सांगितले. असा उपक्रम उत्तर गोव्यातही करण्यात आला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता असे खजीनदार नारायण शिंदे यांनी सांगितले. 

Related posts: