|Tuesday, November 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत गोव्यात 124 मोबाईल टॉवर्स

‘डिजिटल इंडिया’अंतर्गत गोव्यात 124 मोबाईल टॉवर्स 

प्रतिनिधी/ पणजी

‘डिजिटल इंडिया’ योजनेतंर्गत गोव्यात मंजूर झालेल्या भ्रमणध्वनीच्या 124 टॉवर्सपैकी 74 टॉवर्स उभारण्यात आलेले आहे. त्यातून प्रत्येक टॉवर्समागे दरमहा गोवा सरकारच्या तिजोरीत रु. 20 हजार जमा होत आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी वरील माहिती दिली. गोवा सरकारला यातून सध्या रु. 14 कोटी मिळालेले आहेत. दरवर्षी त्यात 10 टक्के वाढ होईल असे ते म्हणाले.

 या प्रतिनिधीशी बोलताना ढवळीकर यांनी सांगितले की, रिलायन्स कंपनीने 4 जी सुरु करताना जे नव्या पद्धतीचे टॉवर्स उभारले त्याचा लाभ गोवा सरकारने घेतला आहे.

 भ्रमणध्वनीबरोबरच अन्य फायदे

 या टॉवर्सचा बहुउद्देशीय उपयोग आहे. या टॉवर्सचा वापर प्रामुख्याने भ्रमणध्वनीसाठी आहेच. शिवाय या टॉवर्सच्या वरच्या टोकाला दिवे बसून त्याद्वारे रस्त्यावर प्रकाश टाकण्यास उपयोग होत आहे. शिवाय या टॉवर्सवर कॅमेरा बसवून टेहळणी करणे पोलिसांनाही उपयोगाचे ठरते. राज्यात 124 टॉवर्स अशातऱहेने उभारले जात आहेत. सर्वच टॉवर्सवर केमेरे व दिवे बसविले जाणार नाहीत. जिथे आवश्यक त्याच ठिकाणी कॅमेरे लावले जातील.

राज्य सरकारला या टॉवर्सपासून भरपूर आर्थिक लाभ मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न केले आहेत. त्यानुसार सध्या 74 टॉवर्स उभारलेले आहेत व त्यातून गोवा सरकारला दरमहिन्याला रु. 20 हजार मिळतील तसेच दरवर्षी व्याज 10 टक्के वाढ केली जाणार आहे. राज्य सरकारने सध्या 14 कोटी संबंधित कंपनीकडून प्राप्त केले आहेत. याशिवाय रस्त्याच्या कडेला ज्या केबल्स टाकल्या जात आहेत त्यातूनही गोवा सरकारला महसूल प्राप्त झाल्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Related posts: